आपला जिल्हा

धनू भाऊ तुमच्या ‘राजा’तला ‘राम’गेला दोन्ही सुर्यांनी जिल्ह्याच्या आशेचा किरण मावळला

बीड — धनु भाऊ तुम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी विराजमान झाले. राजा रमास्वामी सारखी, गीते सारखी माणसं जाणीवपूर्वक आणली. उण्याला पुरवठा म्हणून जगतापांची भर देखील घातली. या महामारीच्या संकट काळात तिघा जणांनी मिळून जिल्ह्याची वाट लावली. सोयी-सुविधा देण्यात तुम्हाला आतापर्यंत परळीत बरी वाटली. बाकीच्या तालुक्यांना सापत्नभावाची वागणूक दिली. आपण जिल्ह्यात आणलेल्या या त्रिमूर्ती नी जनतेला रझाकाराची आठवण करून दिली. जिल्हा रुग्णालय गीतेनी वाऱ्यावर सोडलं परिणामी लोकांना बेमौत मरावं लागलं. गीते मुळे जनतेला स्वर्गातले देव आठवले. राजाराम स्वामीं सारखा हिरा तर उभ्या महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही आजही संपूर्ण जिल्ह्यावर हे राम म्हणायची वेळ आली असताना. या रामाच्या राजाचा जीव रामड्यात अडकल्याच दिसत आहे. सध्या वाळू माफिया क्लब अवैध दारू विक्री सारख्या धंद्यांना लाॅकडाऊन मधून मोकळीक दिली आहे तर रुग्णांना वाचवण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकावर जिझिया कर लादत लुटमार सुरू केली आहे. जगतापांचा कारभार तर रामभरोसे च आहे. त्यांची आलेला दिवस बळेच ढकलण्याची वृत्ती जिल्ह्याला घातक ठरू लागली आहे. एकूणच धनु भाऊ तुमच्या काळात जिल्ह्याला नको त्या हलाखीला सामोरे जावे लागत आहे. पण एवढे लक्षात ठेवा. आज जनतेवर वेळ आहे उद्या निवडणुकीत तुम्हाला जनतेपर्यंत जायचे आहे. जनता डोक्यावर ही सहज घेते तशीच पायदळी तुडवते हा बीड जिल्ह्याचा इतिहास सर्वश्रुत आहे.

धनु भाऊ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आपण जी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारली त्यावेळी प्रत्येकाने तुमच्यात स्व. गोपीनाथ मुंडे ची प्रतिमा पाहिली. येणाऱ्या काळामध्ये त्यांची उणीव नक्कीच भरून निघेल अशी नवी आशा निर्माण झाली. सुदैवाने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी तुमच्यावर आली. जनता ही प्रचंड आनंदली. बीडच्या प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा बॅकलॉग तुम्ही भरून काढलाच नाही. पण महत्त्वाच्या पदावर तुम्ही राज्यभरातून निवडून निवडून माणसं आणून बसवली. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते यांनी आरोग्य व्यवस्थेची वाट लावली. त्यांच्यावर टीका होऊ लागली तर आशा टीकेकडे लक्ष द्यायचं नसतं असा मोलाचा सल्ला तुम्ही दिला. हा सल्ला मिळताच त्यांच्या गैरकारभाराचा नंगानाच सुरू झाला. परिणामी अनेकांना जीव गमवावा लागला. जिल्हा रुग्णालयात रेमडीसिवर नाही, ऑक्सीजन बेड नाही वेळेवर उपचार नाही. उपचार झालाच तर माणूस घरी येईल का नाही याची शाश्वती राहिली नाही. व्हरांड्यात देखील रुग्णांना आपले प्राण सोडावे लागले. अहो नियुक्त झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून देखील कशी कमाई होईल याकडे त्यांनी लक्ष दिलं. ढकल पास झालेली माणसं खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी नियुक्त केली. याचा परिणाम रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भोगावा लागला. एक गोष्ट लक्षात ठेवा गीते तुम्हाला निवडणुकीत किती उपयोगाला येईल हे माहीत नाही पण गीते मुळे तुमच्या प्रतिमेला जात असलेला तडा पुन्हा सांधला जाणार नाही. हे झाल आरोग्य यंत्रणेच कायदा-सुव्यवस्थेची लक्तरं देखील राजा रामास्वामी आणून बसवल्यामुळे वेशीला टांगली गेली. माणसं पारखण्याची आपला प्रचंड हातखंडा आहे. पण असला नमुना आपल्याला कुठे भेटला याचा जिल्ह्यातील जनतेला नवल वाटत आहे. अवैध धंद्यांना राजाश्रय देत नुसता धुमाकूळ घातला आहे. कायदा सर्वसामान्य माणसाला आहे तर बीड जिल्ह्याची पोलीस यंत्रणा अवैध धंद्या वाल्यांचे पाय चाटत आहे. ‘निर्लज्जम सदासुखी ‘ या म्हणीचा प्रत्यय पोलीस अधीक्षकांवर होत असलेल्या टिके वरून जाणवत आहे. पालकमंत्री झाल्यापासून तुम्हाला जिल्ह्याला आरटीओ आणता आला नाही. या संकटाच्या काळामध्ये लोकांना घराच्या बाहेर पडायचे म्हटले तर अनेकां जवळ लायसन नाही‌. घरात कोणी आजारी पडले तर दूसर्‍याची गाडी घेऊन का होईना बाहेर पडलेच तर उपचार गेला खड्ड्यात आधी राजारामा स्वामींच्या पोलिसांचा खिसा गरम करावा लागतो. सर्वसामान्यांत सोडा अत्यावश्यक सेवेतील लोकांना देखील दरिद्री पोलिसांची बद्री भरावी लागत आहे.रझाकारांच्या काळात देखील थोडीफार माणुसकी दाखवली जात होती आता माणुसकी ही पण फक्त कोषातच दिसू लागली आहे. अवैद्य धंदे राजरोस सुरू आहेत. त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत तर सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडे घातले जात आहेत. अशीच काहीशी स्थिती जिल्हाधिकाऱ्यांची देखील आहे. फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री आले की स्वतःची खुर्ची त्यांना बसायला दिली की सर्व प्रश्न मिटले असा ग्राह्य धरला आहे. या महामारीच्या संकटात त्यांनी एक खंबीर निर्णय घेतला नाही. जिल्हाधिकारी म्हणून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर वाकायच असतं. उलट हेच विनंतीवजा अधिकाऱ्यांना आदेश देत असल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी ज्या माणसाची पोथी ओळखली आहे. त्या माणसाची किंमत गेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकाऱ्यांना कशी वाटणार. एकूणच धनुभाऊ जिल्ह्याचा कारभार कोरोना काळ प्रशासनाच्या गाढवाच्या लाथाचा सुकाळ अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकंदरच जनतेला मानसिक आधार देण्याच्या स्थितीत तुमचा एकही अधिकारी पूर्ण जबाबदारीने काम करत असल्याचं दिसत नाही. तुमची ही स्थिती त्याहून वेगळी नाही. तुम्ही सध्या पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जबाबदारी संभाळत आहात की परळी तालुक्याची हेच समजायला जनतेला तयार नाही. असू द्या परळी साठी तुम्हाला जे करता येईल ते करा पण थोडं तरी इतर तालुक्‍यांत कडे लक्ष द्या पालक मंत्री म्हणून जबाबदारी देखील तुमच्यावर आहे याची जाणीव असू द्या. किमान या संकटाच्या काळात तरी तुमच्या या त्री मूर्तींच्या नाकात वेसन घालण्याचा प्रयत्न करा. अन्यथा त्यांनी सुरू केलेली रजाकारी एक दिवस तुम्हाला देखील बुडायला लावेल. ही लोकशाही आहे याची जाणीव राहू द्या. यांच्या कारभारामुळे जनतेच्या प्रश्नाला उत्तर देणे तुम्हाला अवघड जाणार आहे. जसे तुम्ही जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. संकटाच्या काळात असले अधिकारी आणून जनतेची छळवणूक सुरू केली आहे ती जनता तुम्हाला देखील वाऱ्यावर सोडले शिवाय राहणार नाही याची जाणीव असू द्या अशी भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली आहे जात आहे. फक्त ही जनभावना तुम्हाला काय वाटेल याची जाणीव आम्ही न बाळगता सह्याद्री च्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close