आरोग्य व शिक्षण

जनता बसू लागली घरात, म्हणून रुग्णसंख्या आली हजाराच्या आत

बीड — सलग दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घडत असल्याचा आशादायक चित्र निर्माण झाला आहे. गुरुवारी आलेल्या अहवालात फक्त 992 रुग्ण नव्याने आढळले आहेत. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे काही प्रमाणात घटल्यामुळे लॉकडाऊन चा असर दिसू लागला आहे.
कडक निर्बंध घातल्यानंतर देखील ग्रामीण भागात कुरूना रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरली होती. परिणामी याचा ताण आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून रुग्ण संख्या घटत असल्याचे अहवालावरून दिसत आहे. रोज दीड हजाराच्या घरामध्ये रुग्ण संख्या जात होती. गुरुवारी प्राप्त झालेल्या 3877 जनांच्या अहवालात 992 रुग्ण नव्याने सापडले आहेत. अंबाजोगाई तालुक्यात 70 रुग्ण सापडले आहेत. आष्टी सारख्या ग्रामीण भागात 114 तर बीड तालुक्यामध्ये 129 रुग्ण सापडले आहे. धारूर मध्ये 53, गेवराई मध्ये 94 केज मध्ये 103 माजलगाव मध्ये 54 , परळी मध्ये 55 पाटोद्यात तब्बल सर्वाधिक 167 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. शिरूर तालुक्याची संख्या देखील 128 वर गेली आहे. सर्वात कमी रुग्ण संख्या वडवणी तालुक्यात फक्त 25 आढळून आली आहे. दोन दिवसाच्या अहवालावरून तरी दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close