क्राईम

राम, लक्ष्मणाचा मारेकरी ‘ परमेश्वर’, भुतेकरांनी केला जेरबंद

बीड — पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालत दोन भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना नागपूर (खु.) येथे सोमवारी रात्री ११ वाजता घडली होती.या प्रकरणातील आरोपीं परमेश्वर साळूंके यास तीस तासाच्या आत जेरबंद करण्यात एपीआय शरद भूतेकर यांना यश मिळाले आहे.
१५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके याने राम साळुंके (५०) व लक्ष्मण साळुंके (४७) या दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती. तेंव्हा हा वाद आपसात मिटला होता; परंतु सोमवारी परमेश्वरने या दोघांना फोनवरून शिवीगाळ केली. याबाबत त्याला समजवण्यासाठी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके गेले होते. यावेळी भररस्त्यात त्यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके, सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी परमेश्वर साळुंकेविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होता. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे एपीआय शरद भुतेकर यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत घटनेच्या तीस तासाच्या आत आरोपीस पकडण्यात यश मिळवले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close