आपला जिल्हा

वीज पुरवठा सुरळीत करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू होऊन लाईनमन चा मृत्यू

आष्टी —  तालुक्यातील पिंपळा उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या खरडगव्हाण फाटा येथे वीजेच्या धक्क्याने एका वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. शरद पांडुरंग थोरवे (वय 40) असे त्या वायरमनचे नाव असून विद्युत खांबावरील लाईटची दुरुस्ती करताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला.

अचानक विद्युत पुरवठा सुरू
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील शरद पांडुरंग थोरवे (वय 40) हे महावितरण कंपनीच्या पिंपळा उपकेंद्रात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. पिंपळा उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या पारोडी बोरोडी या मार्गाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शरद थोरवे हे मंगळवार (दि.18)चार वाजण्याच्या सुमारास खरडगव्हाण फाटा परिसरातील एका विद्युत खांबावर गेले असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने ते तारेला चिकटले व नंतर खाली पडले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरू

लाईन दुरुस्ती करण्यासाठी सदरील वायरमन यांना उपकेंद्रातून परमीट घ्यावे लागते. शरद थोरवे हे अनुभवी वरिष्ठ तंत्रज्ञ असल्याने त्यांनी परमिट घेतले होते का? तसेच लाईन दुरुस्तीसाठी त्यांना सोबत सहाय्यक घ्यावा लागतो. ते एकटेच लाईन दुरुस्ती कसे करत होते? त्यांचे मृत्यूचे खरे कारण हे पोलीस तपासात समोर येईल. मृत शरद थोरवे यांच्यावर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून खुंटेफळ येथे सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महावितरणचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close