क्राईम

युसुफ वडगावात घरफोडी; 68 हजाराचा ऐवज लंपास

अंबाजोगाई – घराचे गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत पेटीत ठेवलेले नगदी 11 हजार रुपये आणि दागिने असा 68 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कोपरा येथे सोमवारी मध्यरात्री घडली . या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे .
कोपरा येथील खुदबोद्दीन याकूब शेख हे शेती आणि मुकदमकी हा व्यवसाय करतात . सोमवारी रात्री जेवण आटपून त्यांच्यासह कुटुंबातील सदस्य झोपले . रात्री 11 ते मंगळवारी 3.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला . घराची झडती घेत पेटी तोडून पेटीत ठेवलेले रोख 11 हजार रुपयांची रोकड , 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गलशर , 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी , 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुंबर , 2500 रुपये किंमतीचा सोन्याचा बदाम असा 68 हजार 500 रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला . खुदबोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे . पोलीस नाईक पांडुरंग वाले हे पुढील तपास करीत आहेत .

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close