क्राईम

क्षूल्लक कारणावरून दोन भावांचा नागापूरात  खून

बीड — क्षूल्लक कारणावरून 15दिवसापूर्वी झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. चक्क दोन भावांचा भर रस्त्यातच कुर्‍हाडीने वार करून खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री बीड तालुक्यातील नागापूर येथे घडली आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

राम साळुके ( ५० ) व लक्ष्मण साळुके ( ४७ ) अशी मयतांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. क्षूल्लक कारणावरून  नागापूरात  १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे रूपांतर दोन भावंडांच्या खुनात झाले . कुहाडीचे घाव घालत दोन भावांना निघृणपणे संपविण्यात आले . १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुके याने दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती . तेंव्हा हा वाद आपसात मिटला होता ; परंतु सोमवारी परमेश्वरने दोघांना फोनवरून शिवीगाळ केली . याबाबत त्याला समजवण्यासाठी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुके गेले होते . यावेळी भररस्त्यात त्यांच्यावर कुर्‍हाडीने घाव घालून खून करण्यात आला . या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके , सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली . पंचनामा करून शव जिल्हा रुग्णालयात पाठविले . मंगळवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले . परमेश्वर साळुकेविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे.

आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना-

या प्रकरणातील आरोपी परमेश्वर साळुंखे हा खून करून फरार झालेला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले असल्याची माहिती पिंपळनेर पोलिस ठाण्याचे प्रमुख शरद भुतेकर यांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close