आपला जिल्हा

लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांसाठी बि बियाणे खरेदीस मुभा द्यावी-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड —  जिल्हयातील खते बि – बियाणे फर्टीलायजर दुकाने सकाळी ०७.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत उघडे ठेवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे केली आहे

सुदैवाने या वर्षी पावसाळी हंगाम हा चांगला होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून या वर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, तुर, मका, उडीद, मुग आदी पिकांची लागवड होणार असून जुन महिन्यात वेळेवर पाऊस पडेल असा अंदाज
असून शेतकऱ्यांना बि – बियाणे व खते खरेदीसाठी बीड जिल्हयातील खतांची दुकाने हि सकाळी
०७.०० ते दुपारी ०१.०० वाजे पर्यंत उघडी ठेवणे गरजेचे असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बि
-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी वेळ मिळेल या बाबत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी असून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता दुकानाची वेळ वाढवून देण्यात यावी.
खरीप हंगामाचा कालावधी पाहता व पेरणीचा काळ हा जवळ येत असून शेतकऱ्यांना बि – बियाणे व खते खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता या बाबत वरील प्रमाणे निर्णय घेण्यात यावा अशी आग्रहाची मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना निवेदनाद्वारे केली आहे

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close