आरोग्य व शिक्षण

पाचवी व आठवी ची स्कॉलरशिप परीक्षा रद्द

पुणे – कोरोना महामारीमुळे राज्यावर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी, आठवीची स्कॉलरशिप परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याच जाहिर केलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यासंदर्भात कळवले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३ मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख योग्य वेळी कळविण्यात येणार आहे.

यंदा राज्यातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता एकूण ४७६६२ शाळांनी नोंदणी केली आहे. इयत्ता ५वीचे ३८८३३५ तसेच इयत्ता ८ वीचे २४४१४३ असे एकूण ६३२४७८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी हीच आमची प्राथमिकता आहे, अस महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close