क्राईम

पाटील कसला खाकीतील वीर; हा तर पैशाच्या तालावर नाचणारा तमासगीर

बीड — बीडच्या पेठेत आख्ख्या कायद्याचा विश्वासघात करत पाटलांनेच पैशाच्या तालावर नाचायला सुरुवात केलीअसल्याचे चित्र सध्या बीडकर अनूभवत आहेत. ‘पैसा फेको तमाशा देखो ‘अस म्हणत अवैध धंद्यांवाल्यानी नाचवायला सूरूवात केलीच आहे.पण यात आता व्यापाऱ्यांची देखील भर पडलीआहे.पाटलाने अक्षरशःकायद्याचा तमाशा तर पोलिस ठाण्याला फडाच रुप आणलं आहे.याच ताज उदाहरण म्हणजे भल्या पहाटे दूकान उघडुन व्यवसाय करणाऱ्या दूकानांना महसूल ने सिल ठोकले. हा गुन्हा पेठ बीड पोलिस ठाण्यात उशिरा दाखल झाला. त्यातही एफआयआर मध्ये ज्या वाहनांमध्ये माल होता त्यांनाच आरोपी करण्यात आले. पोलीसांच्या प्रेसनोटमध्ये देखील वाहन चालकांची नावे आहेत, मात्र त्यांना ज्यांनी माल विकला त्या व्यापाऱ्यांची नावे नाहित. केवळ दुकानांची नावे आहेत. हा सगळ्यात मोठा पुरावा चर्चेचा विषय बनला आहे.

बंद फितुरीचा पाटलाच्या अंगात मुरलेल्या गुणांचा परिणाम कायद्याचे रक्षणकर्ते असतानादेखील त्याच्याशीच बेइमानी करताना पैशावर नाचण्याच्या मूळ स्वभावाचं दर्शन जनतेला होत आहे. परिणामी बीडच्या पेठेतील ठाण्याला तमाशाचा फड बनवल गेलं आहे. त्यामुळे च या ठिकाणी अवैध धंदे करणाऱ्यांना पायघड्या घातल्या जातात.तर इज्जतीच जीवन जगताना आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी फिर्याद घेऊन गेलेल्या लोकांना आरोपी व अरेरावीची भाषा पाटलाकडून वापरली जाते. चौकशीच्या फेर्‍यात देखील हा पाटील अडकला आहे पण मुळात आशा वर कमाईवरच जगणारा त्यांचा ‘स्वामी'(राजा) असेल तर दाद मागणार कोणाकडे अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. कालचच उदाहरण घ्या.पेठ बीड हद्दीत रविवारी भल्या पहाटे उघडलेल्या काही किराणा दुकानांवर कारवाई झाली. यात महसुलने ९ दुकान सिल केल्या. सकाळच्या कारवाईचा गुन्हा पेठ बीड पोलीसात उशीरा दाखल झाला. त्यातही एफआयआर मध्ये ज्या वाहनांमध्ये माल होता त्यांनाच आरोपी करण्यात आले. पोलीसांच्या प्रेसनोटमध्ये देखील वाहन चालकांची नावे आहेत, मात्र त्यांना ज्यांनी माल विकला त्या व्यापाऱ्यांची नावे नाहित. केवळ दुकानांची नावे आहेत. वाहनचालकांची मात्र वाहन क्रमांकासह नावे देता येतात, व्यापाऱ्यांची नावे पोलीस का देत नाहित? व्यापाऱ्यांना आरोपी करण्यात आलेच नाही. शिवाय ‘ढवळ्या पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला’या म्हणीचा प्रत्यय देखील अनुभवायला मिळाला. पैशाच्या तालावर नाचताना तहसीलदार देखील याने बिघडून टाकला. या 9 व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करून त्यांच्या दुकानाला ठोकलेले सिल काढण्यात आले. उद्या भल्या पहाटे दुकान उघडायला हे दुकानदार मोकळे झाले. मग याच दुकानदारांना मोकळीक का ? पैसाच घेऊन नाचायच असेल तर बाकीच्या लॉक डाऊन पाळणाऱ्या व्यापाऱ्यांकडून देखील पैसा घ्या! त्यांच्याही तालावर नाचा असा आता व्यापाऱ्यांकडून देखील संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. एकूणच राजा रामास्वामी च्या राज्यात कायद्याचं पानिपत झालं आहे. कायद्यावरील विश्वास यामध्ये मारला जात आहे. मेहुणी बायको मिंधि संसार असलेल्या एस पी काहीच कारवाई करणार नाहीत. कारण पेठ बीड पोलिस ठाण्याचा फड जास्त कमाई करून देणारा असल्यामुळे ‘राजा’ची विशेष मर्जी पाटलावर असल्याचं आता उघडउघड बोललं जाऊ लागला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close