आपला जिल्हा

वडवणी येथील दोन कोरोणा केअर सेंटरला नगर पंचायतने शौचालय व स्नानगृह द्यावे –अँड. अजित देशमुख

वडवणी — वडवणी तालुक्यातील तीन पैकी दोन कोरोना केअर सेंटर मध्ये केवळ प्रत्येकी दोन शौचालय आणि दोन बाथरूम आहेत. या दोन्ही ठिकाणी असलेल्या बाधितांची संख्या दोनशेच्या जवळपास आहे. त्यांना कमी पडत आहेत. त्यामुळे नगर पंचायत, वडवणीने त्यांच्याकडे तयार असलेले शौचालय आणि स्नानगृह या दोन ठिकाणी तात्काळ उभारून द्यावे असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

वडवणी येथील तीन सेंटरवर अँड. देशमुख यांनी यांनी पहाणी केली. या दोन सेंटर शौचालय आणि स्नानगृह अशी परिस्थिती आढळून आली. उपचारासाठी येथे असलेले रुग्ण आणि आवश्यक आवश्यक शौचालय आणि बाथरूमची संख्या पाहता या ठिकाणी आणखी आवश्यकता आहे, हे कमी पडत आहेत.

त्यामुळे देशमुख यांनी या संदर्भात नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्री बागुल यांच्याबरोबर चर्चा केली. आणि नगर पालिकेकडे अस्तित्वात असलेल्या या वस्तू त्यांनी तात्काळ द्याव्यात, अशी मागणी केली. नगरपालिका अडचणीच्या काळात आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या सुविधा का पुरत नाही ? हा देखील एक प्रश्न वडवणी येथिल जनता उपस्थित करत आहे.

कोरोणा काळामध्ये नगर पंचायतीने हे रुग्ण वाढू नयेत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वडवणी मध्ये कोरोना केअर सेंटर चालू आहेत. त्यांना आपल्या जवळील उपलब्ध साधन सामग्री तात्काळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे पंचायत ने हे साहित्य दोन सेंटर ना तात्काळ द्यावे अन्यथा नगर पंचायत, वडवणी समोर आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही अँड. देशमुख यांनी दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close