आपला जिल्हा

बीडमध्ये पाच दिवसांसाठी पुन्हा कडक लाॅकडाऊन

बीड — जिल्ह्यात 8 मे ते 12 मे या पाच दिवसांच्या कालावधीत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या पाच दिवसात जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना किराणा दुकाने, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.
शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकिय विमा कार्यालय, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन वितरण, सैनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा आदी अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना सुरू राहतील. इतर कोणत्याही आस्थापना या पाच दिवसात चालू राहणार नाहीत. दि.8 ते 12 मे रोजी जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना किराणा दुकाने, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी व आदी पूर्णतः बंद राहतील. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील, तसेच प्रत्येक दिवशी जिल्ह्यातील कृषि आस्थापनांना लॉकडाऊनमध्ये खते, बी-बियाणे आणि कृषि विषयक औषधे यांच्या वाहतूकीच्या बाबतीत दि.08.05.2021 ते 12.05.2021 या कालावधीत परवानगी देण्यात येत आहे. तसेच बँकेमध्ये त्यांना सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वा. या वेळेत आर्थिक देवाण-घेवाण करण्यास परवानगी देण्यात येत आहे
दि.8 ते 12 मे रोजी पर्यंत केवळ पायदळ / गाडीवर / हातगाड्यावर फिरुन दुध, भाजी व फळांची विक्री केवळ सकाळी 7.00 ते 10.00 वाजेपर्यंत व फक्त फळांची विक्री सायंकाळी 05.00 ते रात्री 07.00 या वेळेत करता येईल. बॅंकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी 10.00 ते दु .12.00 वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील, पेट्रोलपंप व गॅस एजेंसी यांना कंपनीस देयके द्यावी लागतात. तसेच पेट्रोलपंपावर रोख रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होते. करिता पेट्रोल पंप व गॅस एजंसी यांना सदर वेळेत बँकेत जाऊन कामकाज करता येईल. सर्व अधिकारी / कर्मचारी जे कोरोना विषयक कामकाज करत आहेत (उदा. डॉक्टर्स, नर्सस, आरोग्य विभागाचे, महसूल विभागाचे, पोलीस विभागाचे, जिल्हा परिषदेचे इ.अधिकारी / कर्मचारी) ज्यांचेकडे संबंधीत कार्यालय प्रमुखाने दिलेले ओळखपत्र असेल त्यांनाच कार्यालयात ये – जा करण्याची मुभा असेल, दिनांक 08 मे ते 12 मे या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येतील. असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी शुक्रवारी दि.7 मे रोजी काढले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close