आपला जिल्हा

सिरसाळ्यात उभारलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण

    • परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम

सिरसाळा  —- : परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सिरसाळा येथे उभारण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे उद्या पासून मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहेत.

यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी येथे उपलब्ध सुविधांची पाहणी केली तसेच येथे आवश्यक असलेल्या डॉक्टर्स व अन्य स्टाफ उपलब्ध करून, रुग्णांना भोजन, नाष्टा आदी व्यवस्थापन करण्याबाबत सूचना केल्या. येथे दाखल रुग्णांना नाथ प्रतिष्ठान व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने भोजनही मोफत देण्यात येणार आहे.

यावेळी परळी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, शिवाजी सिरसाट, पंचायत समिती सभापती पिंटू मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, रा. कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, माऊली तात्या गडदे, सिरसाळा सरपंच राम किरवले, ग्रा.सदस्य संतोष पांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे, डॉ. दीक्षा मुंडे, बीडीओ श्री. केंद्रे, नायब तहसीलदार रुपनर , कृ.उ.बा.स.चे सचिव श्री. रामदासी, यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे यांनी या कठीण काळात समर्पित भावनेने उभारलेल्या या कोविड केअर सेंटरला अत्यंत कमी वेळेत सुरू केल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांचे कौतुक केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close