आपला जिल्हा

बीड नगर पालिकेच्या माध्यमातून बीड मध्ये ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभा राहणार

    • नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्षांना दिले आश्वासन

बीड — बीड तालुक्यातील अंथरवण प्रिंप्री येथे स्व.बाळासाहेब ठाकरे 500 बेडच्या कोवीड सेंटरचे उदघाटन आज राज्याचे नगरविकास मंञी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड तालुक्यासह बीड शहराचा ऑक्सिजनचा तुटवडा कमी व्हावा यासाठी बीड नगर पालिकेला ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि विद्युत धायणी संदर्भात स्वतः हुन आश्वासन दिल्यामुळे ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प बीड नगरपालिकेच्या माध्यमातून बीड मध्ये उभा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोणाच्या परिस्थितीत राज्यामध्ये रेमडेसीवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, लसींचा तुटवडा जाणवत असताना शासन यावर उपाय योजना शोधत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे नगर विकास मंत्री मा.एकनाथ शिंदे हे बीड तालुक्यातील अंथरवण प्रिंप्री येथे स्व.बाळासाहेब ठाकरे 500 बेडच्या कोवीड सेंटरचे उदघाटन करण्यासाठी आले होते.यावेळी एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून
बीड जिल्ह्यासह बीड मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्र्यांना बीड शहरासाठी आवश्यक असलेल्या विद्युत धायणी संदर्भात निवेदन देऊन वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली.यावेळी एकनाथ शिंदे यांनी विद्युत धायणी बरोबरच नगरपालिकेने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या संदर्भात स्वतः हुन आश्वासन देऊन दोन्ही कामासाठी नगरविकास निधी देणार असल्याचे सांगितले.तसेच संबंधित यंत्रणेला निर्देश देऊन तात्काळ बीड नगरपरिषदेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.
ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प बीड मध्ये उभा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये नगरपालिकेचा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा राहू शकतो.त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यादौऱ्यात केवळ कोविड सेंटर चे उद्घाटन नव्हे तर त्यांच्याकडून आवश्यक असलेल्या बीड शहरातील अनेक प्रश्न सोडवणूक करून घेण्याचे काम नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.

याप्रसंगी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर,रोहयो व फलोत्पादन मंञी संदिपान भुमरे,मा.खा.चंद्रकांतजी खैरे,मा.मंञी जयदत्त (आण्णा) क्षीरसागर,अर्जून खोतकर,बदामराव पंडित,प्रा.सुरेश नवले,नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर,जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, डॉ.योगेश (भैय्या) क्षीरसागर यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळी मागणी केली आणि काही तासातच दोन कोटी रुपये मंजूर

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेसाठी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि विद्युत शवदाहिनी साठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत तातडीने निधी द्यावा अशी मागणी केली होती सकाळी ही मागणी केल्यानंतर अवघ्या काही तासातच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून बीड नगरपालिकेला दोन कोटी रुपयाचा निधी तातडीने वर्ग केला आहे याबाबतचे आदेश देखील काढण्यात आले आहेत या निधीतून बीड नगरपालिकेच्या वतीने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे व आरोग्य विषयक काम तातडीने हाती घेणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी सांगितले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close