आपला जिल्हा

माजी मंडळाधिकारी प्रभाकरराव जोशी यांचे निधन

वडवणी —तालुक्यातील जनपरिचित असलेले माजी मंडळाधिकारी प्रभाकरराव जोशी हे गेल्या आठ दिवसापासून रुग्णालयात उपचार घेत होते मात्र गुरुवारी (दि.6) सायंकाळी त्यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार उदय जोशी यांचे ते वडिल होत.

वडवणी तालुक्यातील महसुल विभागामध्ये तलाठी ते मंडळाधिकारी म्हणून सर्व तालुकाभरात काका म्हणून प्रभाकराव जोशी यांची ओळख होती. महसुल विभागामध्ये काम करत असताना ते धार्मिकही होते. आजपर्यंत प्रभु श्रीरामाचे नित्य नियमाने पुजाअर्चा करत होते. त्या निधनाने तालुकाभरात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, गणेश जोशी, उदय जोशी, विनोद जोशी या मुलांसह सुना, नातू असा परिवार आहे. प्रभाकरराव जोशी यांच्यावर गुरुवारी रात्री वडवणी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जोशी परिवाराच्या दु:खात ‘सह्याद्री् माझा ‘परिवार सहभागी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close