क्राईम

डीवायएसपी वाळके चं नसलेलं टाळकं सरकलं; त्याने डॉक्टरला झोडपलं, आज काम बंद आंदोलन

बीड – सध्या बीड जिल्ह्यात लाॅक डाऊन असताना अत्यावश्यक सेवेत कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर विशाल वनवे यांना नसलेलं टाळकं सरकलेल्या डी वाय एस पी वाळकेनी च-हाटा फाट्यावर बेदम मारहाण केली. त्यामुळे वाळके सह मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा या मागणीसाठी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवस कडक लाॅकडाऊनचे आदेश दिले आहेत. दरम्यान अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट दिली आहे. बँक कर्मचारी, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, महसूल व इतर प्रशासकीय कामकाजातील कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे. अशा स्थितीत आज सकाळपासून डीवायएसपी वाळके चा टाळकं सरकलं अन् एरवी अवैध धंद्यावाल्यांपूढे हुजरेगिरी करणारे राजाची पोलीस दिसेल त्या कर्मचाऱ्याला बेदम झोडपू लागली. अवैद्य धंदे वाल्यांचा मांडलिक असलेल्या पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनीदेखील हेल्मेट सक्तीचा बडगा उगारला. सर्व व्यवसाय बंद असताना हेल्मेट आणायचे कुठून असा प्रश्न न पडलेल्या स्वामींनी सख्त अंमलबजावणी सुरू केली. बुधवारी सायंकाळी आष्टी तालुक्यातील टाकलसिंग येथील डॉक्टर विशाल वनवे हे कर्तव्यावर असताना च-हाटा फाटा येथे पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली .त्यांनी ओळखपत्र दाखवले तरीही ही मारहाण केली गेली .त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टर मंडळींनी याविरोधात आवाज उठवला आहे. डीवायएसपी वाळके व मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत आष्टी तालुक्यातील लसीकरणा सह इतर कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close