महाराष्ट्र

अवैध धंद्यावाल्यांचे पाय चाटणारी ‘राजा’ची पोलीस हेल्मेट सक्ती च्या नावाखाली अत्यावश्यक सेवेतील लोकांना ही झोडपू लागली

बीड – लाॅकडाऊनच्या काळात देखील दारू मटका ,क्लब ,वाळू तस्करी सारख्या धंदा करणाऱ्या लोकांपुढे शरणागत असलेले बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी मात्र सरकारी कर्मचारी बँक कर्मचारी याबरोबरच अत्यावश्यक सेवेत असलेल्या लोकांनादेखील हेल्मेट सक्ती च्या नावाखाली वेठीस धरण्याचा व त्यांना मारहाण करण्याचा सपाटा लावला आहे. एसपी साहेब एवढीच कायद्याची अंमलबजावणी करणारे आहात तर अवैध धंद्यांना आळा घाला. अवैध धंद्या वाल्या पुढे शरणागत होऊन नावात असलेल्या ‘राजा’ शब्दाला तरी काळीमा फासू नका अस आता जनतेतून म्हटलं जाऊ लागलं आहे. पोलीस यंत्रणेच्या हप्ते खोरी सोबतच आता हेल्मेट देखील विकायला ठेवा तेवढीच जनतेची सोय होईल व राजा रामास्वामी तुमच्या पोटाची देखील सोय होईल असं देखील भावना व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत.

पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी आपल्या आतापर्यंतच्या झालेल्या कारकिर्दीत अवैध धंद्यांना नेहमीच राजाश्रय दिला आहे. या धंद्या मधून होणारी कमाईपूढे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असले तरी स्वाभिमान हरवलेल्या ‘राजां’ना त्याचं काहीच देणंघेणं नाही. कोरोना परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निर्बंध कडक झाले असले तरी राजरोस अवैध धंदे सुरूच आहेत. दारू मटका पत्त्याचे क्लब या सारख्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये कोरोना संक्रमण वाढवण्याचं काम राजा रामा स्वामींच्या नेतृत्वा खालील पोलिसांनी केला आहे. दोन दिवसापूर्वी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कायद्याचे पालन करा असं सांगताच मी किती कार्यतत्पर आहे. असं दाखवण्याचा प्रयत्न राजा रामास्वामी यांनी सुरू केला आहे. तीन दिवस लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर हेल्मेट सक्ती च्या नावाखाली लोकांना झोडपून काढण्याचा काम पोलिस यंत्रणेने सुरू केले आहे.

या प्रकारातून आरोग्य विभागातील कर्मचारी देखील सुटले नाहीत. ओळख पत्र दाखवले तरी त्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एकीकडे होत असताना दुसरीकडे मात्र अवैद्य धंदे सुरूच आहेत. बीडच्या इतिहासात अवैध धंद्यां वाल्यांची पोलीस यंत्रणा कधीच एवढी मिंधी राहिली नाही. सामान्य जनतेवर हेल्मेटच्या नावाखाली पोलिसांची सुरू असलेली रजाकारी
कधीच अनुभवला नाही. बरं लाॅक डाऊन आहे सर्व दुकान बंद आहेत याबरोबरच नोकरी करणं देखील आवश्यक आहे अशा स्थितीत हेल्मेट लोक आणणार कुठून असा साधा प्रश्न देखील आयपीएस अधिकाऱ्याला पडू नये ? इतका ज्ञानवंत कर्तव्यतत्पर अधिकारी यापूर्वी कधीच अनुभवायला आला नाही. बरं ही सक्ती सामान्यांनाच का महाराष्ट्र दिना दिवशी ध्वजारोहण प्रसंगी यांनी थोबाड उघडं ठेवलं तर चालतं ? पोलिसांनी हेल्मेट नाही घातलं तरी चालतं ? कायदा हा राजा रामा स्वामींचा व त्यांनी सांभाळलेल्या माफियांचा बटीक आहे काय असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जाऊ लागला आहे.माळीवेस भागात डी वाय एस पी वाळके च टाळकं सरकलं अन् एका मेडिकल वर काम करणाऱ्या खाजगी दवाखान्यातील कर्मचार्‍याला गुरासारखं बदडून काढले,त्याच्या हाताला टाके पडले.अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचार्‍यांनादेखील मारहाण केली जात आहे. हा प्रकार इथेच थांबला नाही पुन्हा सायंकाळी चर्‍हाटा फाट्याजवळ टाकळसिंग येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल वनवे यांना देखील मारहाण करण्यात आली. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांना जर मारहाण होत असेल तर पोलिसांच्या दहशतीखाली असलेल्या या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली तर महामारी च्या संकटाच्या काळात अनेक रुग्णांचे जीव धोक्यात येणार आहेत अशा स्थितीत राजा रमास्वामी हात झटकतील पण याच उत्तर पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांना द्यावे लागणार आहे याच भान तरी राजा रामास्वामी यांनी ठेवायला हवं अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close