आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात तीन दिवस कडक लाॅक डाऊन

बीड — जिल्ह्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास नवीन आदेश काढले . बुधवार , गुरुवार व शुक्रवार दि.5 मे,6मे, व 7 मे या दिवशी केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील . सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्रे , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्स , फार्मास्युटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवठा साखळी , लसींचे उत्पादन व वितरण , सॅनिटायझर्स , मास्क , वैद्यकिय उपकरणे , कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा , पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने , टपाल सेवा इ . उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत . दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत सुरु राहील . गॅस वितरण दिवसभर सुरु राहील . बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते दु 12 वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील .  शनिवार व रविवार रोजी 8 मे व 9 मे रोजी जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना ( किराणा दुकाने , भाजीपाला , फळविक्री , चिकन , मटन विक्रीचे दुकाने , बेकरी व कृषीशी संबंधित इ . ) केवळ 7 ते 11 या वेळेत चालू राहतील . शनिवार व रविवार रोजी दिनांक 8 मे व 9 मे केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सायकाळी 5 ते रात्री 7 या वेळेत करता येईल . सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे आदेशात म्हटले आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close