क्राईम

राज्य कायद्याचं? छेऽऽ वाळू माफियांचं ! अधिकाऱ्यांनो आज तहसील मधून वाळूचा ट्रक पळवला उद्या तुमचं.. काय पळवतील हे तुम्हीच ठरवा ?

बीड  — जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असतानाच चक्क दोन- तीन दिवसापूर्वी वाळूने भरलेला ट्रक तहसील कार्यालयाने पकडला होता. आज दुपारी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करत तो वाळू माफियांनी पळवून नेल्याची घटना दुपारी 12 वाजता घडली. महसूल विभागातील अधिकारी वाळू माफियांकडून हप्ता ( भाड) खायला इतके सोकले आहेत की, आत्मसन्मान नावाचा प्रकार अस्तित्वातच राहिला नाही. पदाचा मान प्रतिष्ठा, कायदाच्या गोष्टीसुद्धा अधिकार्‍यांच्या लेखी नगण्य झाल्या आहेत. आज कार्यालयातून ट्रक पळवला उद्या तुमच्या नाकावर टिच्चून तुमच्या काय पळवतील याचा तरी थोडा विचार करा त्यावेळी देखील मिळालेल्या हप्त्यापोटी गप्प बसाल का ? असा संतप्त प्रश्न ग्रामीण जनतेतून विचारला जात आहे.

दोन- तीन दिवसापूर्वी रॉयल्टी पावती नसल्यामुळे MH-11- AC- 5593 या नंबरचा ट्रक कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात आणला होता. रॉयल्टी ची पावती नसल्यामुळे 180528 रुपयांची दंडाची नोटीस सुद्धा ट्रक मालकाला बजावण्यात आली होती. आज दिनांक 4 मे रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार यांचे ड्रायव्हर शेख व आमलेकर कर्मचारी यांना मारहाण करत या ट्रॅकच्या चावी घेऊन ट्रक पळून नेल्याची घटना दुपारी 12 वाजता घडली .ही सर्व घटना तहसील कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे वाळू माफियांचा दादागिरी पुन्हा पाहायला मिळाली आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ते कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात?

तहसील कार्यालयाने दोन-तीन दिवसआधी पकडलेला ट्रक च्या चाव्या ड्रायव्हर आणि कर्मचारी सोबत का घेऊन फिरण्याचे कारण काय?? ट्रकच्या चाव्या सोबत असल्याची माहिती ट्रकच्या मालकांना कशी लागली? जप्त केलेल्या गाड्यांच्या चाव्या सोबत घेऊन फिरता येतात का? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे तहसीलचे कर्मचारी सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

वाळू माफियांची दादागिरी का वाढवली-

चक्क तहसील कार्यालयात घुसून पकडलेले वाळूचे ट्रक पळून पर्यंत वाळूमाफियांची दादागिरी याचं आत्मपरीक्षण महसूल विभागाला करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी प्रशासनातील अधिकाऱ्यांना किती पैसे द्यावे लागतात याचे रेट कार्ड देखील छापून आले होते त्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता हेच अधिकारी इतर वेळी वाळू माफिया बरोबर पार्ट्या करतात एवढेच नाही तर प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना हप्ते देखील देतात. याचाच परिणाम वाळू माफिया यांची दादागिरी वाढली असून थेट तहसील कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण करून पकडलेला ट्रक पळविण्याच्या घटना गेवराई मध्ये घडत आहेत.पण या घटनेची चर्चा देखील ग्रामीण भागात मोठ्या चवीने चर्चिली जात आहे. आज अधिकाऱ्याच्या नाकावर टिचुन माफियांनी ट्रक पळवला उद्या यांच्या… पळवल्या तरी यांना लाज वाटणार नाही ? असं आता वाळू तस्करी च्या तक्रारी करूनही दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत संतप्त प्रतिक्रिया लोक देऊ लागले आहेत.या प्रतिक्रिया कडे आता गांभीर्याने विचार करून ठोस पावले उचलतील का ? की अधिकाऱ्यांचा आत्मसन्मान असाच दमडीसाठी गहाण टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close