आपला जिल्हा

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे धावले खेड्यांच्या मदतीला;उभारले पहिले कोविड सेंटर

बीड — शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे धावले खेड्यांच्या मदतीला;उभारले पहिले कोविड सेंटर — जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कमी पडत असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधीत रुग्ण आढळत असल्याने जनतेच्या आरोग्य हितासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बीड शहरापासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर असणार्‍या अंथरवणपिंप्री तांडा येथे सर्व सोयींनी अद्ययावत असणारे 500 बेडचे सुसज्ज असे स्व.बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर उभारले असून येत्या दोन दिवसात त्याचे लोकार्पण होणार आहे. सध्या 200 बेडची सुविधा असून आवश्यक त्या प्रमाणात बेडची उपलब्धता करुन देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली.

दिनेश पवारांनी दाखवला मोठेपणा- जिल्हाप्रमुख खांडे
अंथरवण पिंप्रीचे दिनेश पवार यांनी आपल्या कार्यकुशलतेमुळे ग्रामीण भागात एक शैक्षणिक हब तयार केले आहे. शिवसेनेच्या वतीने जेव्हा कोविड सेंटरची कल्पना तयार होत असल्याचे पाहून आश्रमशाळेचे प्रमुख दिनेशजी पवार यांनी आपली शाळा कोविड सेंटरसाठी देण्याचा मोठेपणा दाखवला आहे. दिनेश पवार यांनी संकटकाळी समाजहितासाठी जो निर्णय घेतला तो आदर्शवत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख खांडे यांनी म्हटले.

बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात कोरोना बाधित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. गावची गावं कोरोनाबाधीत होत आहेत. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून काही ठिकाणी तर रुग्णांना बेड सुध्दा मिळणे मुश्किल झाले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने अंथरवण पिंप्री तांडा येथील दिनेश पवार यांच्या आश्रमशाळेत अत्याधुनिक सामुग्रीने सुसज्ज असे 300 बेडचे स्व.बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर उभारले आहे. सध्या या कोविड सेंटर मध्ये 200 बेडची सोय करण्यात आली असून आवश्यकतेप्रमाणे बेड वाढवण्यात येणार आहेत. या ठिकाणी रुग्णांवर उपचार करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांसह सर्व स्टाफ एकजीव होऊन काम करणार आहेत. तसेच शासनाने जे निकष घालून दिलेले आहेत, त्या निकषाप्रमाणे येथील रुग्णांना सकाळी नाष्टा आणि दोन वेळेस जेवण दिले जाणार आहे.अगदी शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, त्याप्रमाणे दररोजचे जेवण, चहा, पाणी, नाश्ता, फळे वगैरे सर्व वेळेवर देण्यात आम्ही कमी पडणार नाही.कोरोना महामारीच्या काळामध्ये आरोग्य यंत्रणा सक्रियतेने काम करत आहे. हे या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध झाले. अत्यंत तन्मयतेने कोविड सेंटर कामाला लागले आहे. अशा सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर चांगली सेवा झाली तर ग्रामीण भागातील लोकांचे लाखो रुपये वाचणार आहेत. त्यामुळे केअर सेंटरच्या माध्यमातून खरोखरच सेवा घडावी या हेतुने स्व.बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर उभारले आहे.या ठिकाणी संपुर्ण वैद्यकिय मदत ही रुग्णांना मिळणार आहे. तसेच अति गंभीर रुग्णांसाठी 24 तास रुग्णवाहिका सज्ज असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी म्हटले.

शिवसेनेचा पुढाकार समाजाच्या हितासाठीच- डॉ.पवार

या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार म्हणाले की, कोरोनाच्या या राष्ट्रीय संकटामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पुढाकार घेत कोविड सेंटर उभारण्याचा जो निर्णय घेतला तो अत्यंत कौतुकास्पद आहे. खांडेंच्या या निर्णयामुळे बीड तालूक्यातील ग्रामीण जनतेचे आरोग्य सुरक्षीत राहण्यास मदत होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख खांडे यांचा आदर्श घेत इतर राजकिय पक्षांनीही कोविड संकटात आरोग्य प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन डॉ.पवार यांनी केले.

अंथरवण पिंपरीतांडा येथे स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरच्या जागेची पाहणी काल मंगळवार दि. 4 रोजी करण्यात आली. येत्या दोन दिवसांमध्ये येथे कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. या यावेळी जागेची पाहणी करताना शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक बाप्पू खांडे जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, जयसिंग मामा चुंगडे, जिल्हा सचिव वैजिनाथ तांदळे, दिनेश पवार, बाबूशेठ लोढा, अरुण नाना डाके, उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के, तालुकाप्रमुख गोरख सिंघण, उप तालूका प्रमुख आबा घोडके,नगरसेवक शुभम धूत, शहर प्रमुख सुनील सुरवसे, उपशहर प्रमुख हनुमान पांडे, रतन तात्या गुजर,गणेश खांडे, देवराव घोडके, उपशहर प्रमुख कल्यान कवचट, सखाराम देवकर,उपशहरप्रमुख कामरान भाई शेख, गोविंद खुर्णे, पंडीत खांडे, सुनिल सोनवणे, सरपंच लहू खांडे, अशोक खांडे,माजी सरपंच विठ्ठलराव साळुंके,नागापुरचे चेअरमन नारायण साळुंके, यांच्या सह शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख खांडेंचा स्तुत्य उपक्रम- तहसीलदार वमने
कोरोनाच्या या मोठ्या संकटात समाजहिताच्या दृष्टीकोनातून शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी कोविड सेंटर उभारण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य असा उपक्रम असून यामुळे प्रशासनाला मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागात झालेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे जनता हैराण झालेली असताना शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी ग्रामीण जनतेसाठी उभारलेले हे कोविड सेंटर इतरांनी आदर्श घ्यावा असेच आहे अशी प्रतिक्रिया तहसीलदार एस.बी.वमने यांनी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close