महाराष्ट्र
Trending

पालकमंत्र्यां समोरच कायद्याचं रुप केलं नागडं, एस पी च तोंड पहा उघडं

बीड — जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निर्बंधामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. असं असलं तरी दारू विक्री, जुगार, पत्त्याचे क्लब, अवैध वाळू उपसा एस पी राजा रामा स्वामींच्या मर्जीने राजरोस सुरू आहेत. थोडक्यात काय तर नंबर 2 च्या धंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत. एस पी राजा रामास्वामी कायद्याला , सरकारने घातलेल्या निर्बंधांना कसे फाट्यावर मारतात तेही पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या साक्षीने संपूर्ण जिल्ह्याने आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने केलेल्या ध्वजारोहण समारंभाच्या वेळी जिल्ह्याने अनुभवले.

सर्वांना निर्बंध सारखे असताना एस पी च तोंड उघडच होतं. त्याला झाकायला चार बोटाची चिंधी देखील त्यांना सुरुवातीला मिळाली नाही. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हातात कायद्याची नाडी असल्यावर बिघाडी व्हायला काय वेळ लागणार ? जिल्ह्याचा सत्यानाश असाच होणार? पालक मंत्री ही त्यांना पाठीशी घालणार जनतेला मात्र त्यांच्या कर्माचा भोग भोगावा लागणार असंच चित्र सध्या तरी जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी बीडचा कारभार स्वीकारल्या नंतर अवैध धंद्यांना राजाश्रय मिळाला आहे. माध्यमांनी कितीही ओरड केली तरी त्याकडे लक्ष द्यायला पालकमंत्र्यांना देखील वेळ नाही. पत्त्याचे क्लब, अवैध वाळू उपसा, मटका, अवैध दारू विक्री, यासारखे धंदे अगदी राजरोस सुरू आहेत.

अधिकार पदाचा पुरेपूर वापर राजा रामास्वामी करताना दिसून येत आहेत. अवैध वाळू उपसा संदर्भात माफियां सोबतच तक्रारदारांना धमकावण्याचं काम पोलीस यंत्रणा देखील करत असल्याचा अनुभव वाळू पट्ट्यातील लोकांनी घेतला आहे. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने घातलेल्या कडक निर्बंधामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले आहेत. व्यवसायाचे पूर्ण कंबरडे मोडलेले असताना अवैध व्यवसायांचा कणा मात्र ताठ झाला आहे. हे चित्र सर्व जिल्हा उघड्या डोळ्याने पाहत आहे. सध्या कोरोना ने तांडव सूरू असतांना निर्बंधाच पालन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला फिरणे देखील मुश्किल झालेले असताना हर घडी पोलीस अधीक्षक अवैध धंद्यांना खतपाणी घालत कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी भर घालत आहेत. त्यांच्या बेजबाबदारपणा इतकी वाढ झाली आहे की वेळ काळ परिस्थिती याच भान देखील राजा रामा स्वामींना राहील नसल्याचं पहावयास मिळत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहण प्रसंगी शासनाने घातलेल्या निर्बंधाचं पालन स्वतः पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील केलं. उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील केलं पण त्याच वेळी राष्ट्रध्वजाच्या साक्षीने कायदा निर्बंध खुद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजारामास स्वामी कसे पायदळी तुडवतात हे सर्व जिल्ह्यांने आज पाहिलं. सोशल डिस्टन्स ठेवा, मास्क वापरा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमी जनतेला आवाहन करत असले. या नियमांचीअंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश दिलेले असतानादेखील राजा रामास्वामी च्या तोंडाला मास्क नसल्याचं पहावयास मिळालं. नाका तोंडाला बांधायला दोन बोटांची चिंधी ‘राजा ‘ला मिळू नये यासारखं दुर्दैव जिल्ह्याने यापूर्वी कधीही अनुभवलं नव्हतं. राष्ट्रध्वजाच्या साक्षीनेच संविधानाची पायमल्ली पोलिस अधीक्षकांकडून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असेल तर जिल्ह्यात कायद्याचं राज्य स्थापन कसं होणार ? आहे. कोरोना सारखी महामारी आटोक्यात कशी येणार ? रेमडीसिवीर, ऑक्सिजन, रिकाम्या नसलेल्या खाटा, अपुरी असलेली आरोग्य यंत्रणा यामुळे जनता अशीच मरणार ? की जनतेला मतदान रुपी केलेल्या कर्माचा भोग भोगावा लागणार ? अनेकांना यात आपले जीव गमवावे लागणार ? असं चित्र सध्यातरी पाहावयास मिळत आहे पालकमंत्री एकीकडे जनतेची काळजी वाहण्याचा काम करत असताना त्यांचेच अधिकारी त्यांच्या देखत कायदा कसा पायदळी तुडवतात यावरूनच पालकमंत्र्यांचा धाक देखील राहिला नसल्याचं आता जनतेत बोललं जाऊ लागल आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close