आपला जिल्हा

तेलगाव येथील ट्रामा केअर सेंटर लवकरच ताब्यात घेणार– जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

बीड —  तेलगाव येथे ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम सन २०१६ मध्ये पूर्ण झाले असून त्याचा वापर अद्यापही चालू नाही. या ठिकाणी सत्तेचाळीस ऑक्सिजन बेडची उभारणी करण्यात आली असून ऑक्सीजनची पूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सर्व यंत्रणा कोरोणा महामारीच्या काळात वापरत आणा, अशी विनंती केल्यानंतर त्यांनी ही इमारत लवकरच ताब्यात घेऊन रुग्णांना येथून उपचार देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिल्याची माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.

तेलगावचे सरपंच दीपक लगड यांनी या इमारती संदर्भातील समस्या अँड. अजित देशमुख यांना दाखविल्या. देशमुख यांनी या इमारतीला भेट देऊन ऑक्सिजन यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित असल्याचे पाहिले. त्याचप्रमाणे येथे अस्तित्वात असलेल्या जवळपास पन्नास बेडची त्यांनी पाहणी केली.

ट्रॉमा केअर सेंटर २०१६ साली उद्घाटन होऊन तयार आहे. मात्र याचा वापर अद्याप केला गेला नाही. त्यामुळे शासनाचा हा खर्च देखील वाया गेला आणि इमारतही धूळ खात पडून राहिली, याबाबतही देशमुख यांनी खंत व्यक्त केली आहे.

याठिकाणी अस्तित्वात असलेले जवळपास ४७ ऑक्सिजन बेड कोरोनाच्या काळात वापरात आणली तर माजलगाव आणि धारूर तालुक्याचा प्रश्न निकाली लागेल. मग बाकी यंत्रणा केवळ केअर सेंटर साठी वापरता येईल. आवश्यक त्यांना येथे ऑक्सिजन देण्याची सोय देखील उपलब्ध होईल.

जिल्हाधिकाऱ्यांनी ही इमारत आणि त्यातील यंत्रणा ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले आहे. हा दवाखाना पूर्ण क्षमतेने कोरोना महामारी मध्ये वापरला तर या दोन तालुक्यांना कोठेही हात पसरण्याची गरज पडणार नाही. रुग्णांचा आजार लवकरात लवकर बरी होण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई तात्काळ करावी, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

दरम्यान कोरोना संपल्यानंतर या रुग्णालयाचा वापर तेलगाव वासीयांसाठी नियमित पाणी होईल. परिसरातील वीस-पंचवीस गावांना या दवाखान्यात असलेल्या सर्व सुविधांचा लाभ होईल. अस्तित्वात असलेली इमारत काम आता कामात येणार असल्याने हजारो रुग्णांना भविष्यातही येथे रुग्णसेवा मिळेल, असे ही देशमुख यांनी म्हटले असून तेलगावचे सरपंच दीपक लगड यांनी ज्या पोटतिडकीने भावना मांडल्या, त्यादेखील महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे हे ट्रामा केअर सेंटर लवकर चालू व्हावे, असे आपल्याला वाटत असल्याचे म्हटले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close