क्राईम

थरारक ! भर रस्त्यात अडवून महिलेचा खून

केज — दुचाकीवरून पुतण्या सोबत जात असलेल्या पस्तीस वर्षीय महिलेस केज रोडवरील साळेगाव जवळ भर दुपारी साडे बाराच्या सुमारास आडवून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. अज्ञात आणि केलेल्या या हल्ल्यात लोचना माणिक धायगुडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे गंभीर जखमी झाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या धायगुडा पिंपळा येथील लोचना माणिक धायगुडे व त्यांचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे दोघे मोटार सायकल ने केज कडे जात होते. साळेगाव जवळ हे दोघे आले असता अज्ञात हल्लेखोरांनी या दोघांना रस्त्यात आडवले. तसेच लोचना धायगुडे यांच्यावर हल्ला करत तीक्ष्ण हत्याराने खून केला. यावेळी लोचना धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला. अंकुश दिलीप धायगुडे या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोरांनी अंकुश धायगुडे ची मोटार सायकल घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत असलेल्या अंकुश यास उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close