आरोग्य व शिक्षण

आरोग्य विभागाने परळीच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात 5 सी टी स्कॅन मशीन तत्काळ कार्यान्वित कराव्यात; निधीची अडचण असेल तर दारोदार आरोग्य परडी घेऊन जाऊ

नागरिकांच्या आरोग्यासाठी तिरडीपेक्षा परडी बरी

परळी —- तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. सरकारी सेवेतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा जीवापाड प्रयत्न करत आहेत. पण, त्यांना सरकार कुठलेच पाठबळ देताना दिसत नाहीत. प्रतिपादन परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित घाडगे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

गुरुवार, 22 एप्रिल 2021 रोजी उपजिल्हा रुग्णालयाने बातमी काढली “धनंजय मुंडेंनी यंत्रणा कामाला लावली अन 48 तासात परळीत उभारले 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर; शुक्रवार पासून परळीच्या ग्रामीण रुग्णालयात होणार सुरू”. प्रत्यक्षात आज शनिवार 24 एप्रिल 2021 रोजी सकाळी दहा वाजता कोविड केयर सेंटर सुरू झालेले नव्हते.

कोविड केयर सेंटर सुरू करण्यापूर्वी भंडारा, भांडूप, विरार येथील आगीच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अग्निशामक तपासणी (Fire Audit) करून सक्षम फायर सेफ्टी यंत्रणा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून द्यावी. तसेच नाशिकमधील प्राणवायू संकटाचीही घटना आपल्या इथे घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

24 एप्रिल 2021 रोजी ते सरकारी दवाखान्यातील RTPCR / आर टी पी सी आर यंत्रणा कोलमडल्याने हजरो नागरिक त्रस्त असताना आरोग्य यंत्रणा खोट्या बातम्या प्रसारित करण्यात व्यस्त आहे असे दिसते.

गेल्या दोन महिन्यांत सत्ताधाऱ्यांनी केलेले जवळपास प्रत्येक दावे खोटे सिद्ध होत आहेत. संबंधितांना लक्षात घ्यावे प्रसिद्धीची वेळ नाही तर कामाची आहे.

मोफत सी टी स्कॅन तपासणी उपजिल्हा रुग्णालयात व्हावी
सध्या परळी वैजनाथ शहरात एकचं खाजगी 4 स्लाईसची सी टी स्कॅन मशीन आहे. त्यामुळे त्यावर ताण आहे. सोबतच रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात 5 सी टी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्यातील 3 कोविड तर 2 नॉन कोविड रुग्णांसाठी वापरात आल्या तर तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. प्रत्येक गोष्टीसाठी परळीकरांनी कधीपर्यंत अंबेजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयावर अवलंबून रहायचे?

जर बजेट ही अडचण असेल तर आम्ही नागरिक आमच्या आरोग्यासाठी दारोदार परडी घेऊन जाऊ व जितका निधी उभारला जाईल तो आपल्या सरकारकडे जमा करू. सरकारला आमचे सांगणे आहे की नागरिकांना आरोग्यासाठी तिरडीपेक्षा परडी कधीही परवडेल.

कोविड लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करून साठा उपलब्ध करून देण्याची जिम्मदारी कोणाची?

नागरिक म्हणून परळी प्रतिष्ठान शासन – प्रशासनाला लसीकरण जनजागृती मोहिमेत खांद्याला खांदा लावून मदत करायला तयार आहे. पण, सध्याच अनेकजण लस घेण्यासाठी उत्सुक असताना लस उपलब्ध नाही. यावर सरकारी यंत्रणेकडून फक्त बातम्या नाही तर प्रत्यक्ष कृती अपेक्षित आहे.

आरोग्य विभागाने दररोज मेडिकल बुलेटिन काढावे
परळी वैजनाथ तालुक्यातील आरोग्य विभागास आवाहन आहे की दररोज लस किती लस आल्या किती दिल्या गेल्या, swab साठी किती जणांनी रजिस्ट्रेशन केले त्यानंतर किती जणांचे RTPCR swab किंवा अँटीजेन केले गेले. कोरोना रुग्णांना आवश्यक औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध आहे आदी सर्व बाबींची माहिती मेडिकल बुलेटिन काढून दिली जावी.

जर RTPCR सुरू नसेल तर वेळीच रुग्णांना माहिती मिळाली तर आधीच त्रस्त असलेल्या बाधितांची हेळसांड होणार नाही.

यासर्व पार्श्वभूमीवर परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित घाडगे पाटील यांनी आरोग्य विभागास खोट्या बातम्या काढणे तत्काळ बंद करावे असे आवाहन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close