क्राईम

रेमडिसिवीर इंजेक्शन 22 हजारांस विकतांना पोलिसांनी दोघांना पकडले

बीड — रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची चर्चा गेल्या आठ दिवसापासून सुरू असतानाच तब्बल 22 हजार रुपयांना इंजेक्शन विकताना शहरातील माने कॉम्प्लेक्शन परिसरात शुक्रवारी रात्री दोन तरुणांना पोलीसांनी पकडले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
रेमडीसीविर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक परेशान झालेले असताना प्रशासनाला या काळाबाजारीला आळा घालण्यात अपयश आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून या काळा बाजारी करणारांवर लक्ष केंद्रित केल्याचं पाहावयास मिळत आहे.एका रुग्णाच्या नातेवाईकास एका मेडिकल चालकाने इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले. तब्बल 22 हजार रुपयांना इंजेक्शन देताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलीस कर्मचारी संघर्ष गोरे यांनी दोन तरुणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. श्रेयस बाबासाहेब नाईकवाडे ता. धारूर व कृष्णा ठोंबरे रा.दहिफळ ता.केज अशी पकडलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या काळाबाजारीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलीस आणखी सखोल तपास करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close