आपला जिल्हा

जिल्हा रूग्णालयातील रेमडीसिवीर इंजेक्शन व वाॅर्डबाॅय भरती गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई करा —- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड — जिल्हा रुग्णालयातील रेमडीसिवीर इंजेक्शन आर्थिक हितसंबंध जोपासत निकटच्या व्यक्तींना विकणे तसेच वाॅर्डबाॅय भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणात तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते दिपक थोरात यांना वरील प्रकरणात तक्रार केल्याबद्दल जीवे मारण्याची धमकी देणा-या विरोधात संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांनी मुख्यमंत्री, प्रधान सचिव, गृहमंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य मंत्रालय, आयुक्त आरोग्य संचालनालय मुंबई यांना केली आहे.

बीड जिल्ह्य़ातील जिल्हा रुग्णालयातील मोठ्याप्रमाणात रेमडीसिवीर इंजेक्शन बेकायदेशीर रित्या आर्थिक हितसंबंध जोपासत देण्यात आले आहेत, तसेच 4 इंजेक्शन पत्रकारा मार्फत जिल्हारूग्णालयातुन वरिष्ठ आधिका-याच्या मध्यस्थीने देण्यात आले असून संपुर्ण जिल्हा रूग्णालयातील रेमडीसिवीर यांची आवक आणि जावक याविषयी सखोल तपासणी करण्यात यावी तसेच संभाजी सुर्वे यांच्या म्हणण्यानुसार पेशंटला कमी रेमडीसिवीर इंजेक्शन देऊन कागदोपत्रीच दिल्याचे जिल्हारूग्णालयातुन दाखवले आहे, याविषयी सखोल चौकशी करण्यात यावी.
तसेच कोविड कालावधीतील जिल्हारूग्णालयातील वाॅर्ड बाॅय भरती प्रक्रियेत मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाला असून संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणात तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते दिपक थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देणारे व गैरव्यवहार प्रकरणातील सूत्रधार यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदलनाचा ईशारा डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close