आपला जिल्हा

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवा अन्यथा अधिकारी मार खातील

 आ. सुरेश धस यांचे अभिनंदन- अँड. अजित देशमुख

बीड — रेमडेसिविर इंजेक्शनचा सध्या तुटवडा भासत असला तरी अधिकारी काळाबाजार करण्यात मश्गुल असल्याचे वारंवार समोर येत आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासन यांचे अधिकारी निगरगट्ट झाले असून याबद्दल त्यांना कसलीही आस्था राहिलेली नाही. हे वारंवार समोर येत आहे. आज आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला प्रकार सकृतदर्शनी बरोबर नसला तरी धास्तावलेल्या पेशंटला आस्था देण्यासाठी आ. धस यांनी घेतलेली भूमिका अभिनंदनासाठी पात्र आहेत. त्यांची भूमिका ही लोकभावना आहे. अधिकारी सुधारले नाही तर नक्कीच मार खातील, असेही आम्हाला उद्दीग्न पणाने म्हणावे लागत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासनावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे मत जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आमदार सुरेश धस, अशोक हिंगे, अमर नाईकवाडे आणि इतरांनी कोरोनाच्या परिस्थितीबाबत जी भूमिका मांडली ती अतिशय योग्य होती. त्यांनी मांडलेली भूमिका ही जनभावना आहे. जनतेच्या भावना प्रशासन दाबू शकत नाही. त्यातूनच हा उग्रपणा समोर आला असून धसांचे अभिनंदन त्यामुळेच केले आहे.

जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांवर भरोसा ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे काम सोपे होऊ नये. प्रत्यक्ष लक्ष ठेवावे. जिल्ह्यातील अधिकारी इतक्या मोठ्या प्रसंगाला तोंड देण्याऐवजी तोंड दडवून फिरत आहेत. ही बाब चिंताजनक असून वाढत्या पेशंटला सहारा देण्याऐवजी त्यांना दुःखाच्या खाईत लोटल्या सारखे हे अधिकारी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत असल्याचे दिसते. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वी कित्येक वेळा सांगितले आहे. मात्र जिल्हाधिकारी आपली भूमिका बदलून कडकपणा अंगात आणायला तयार नाहीत.

ज्या रुग्णांनी खाजगी अथवा सरकारी दवाखान्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केलेली आहे आणि अर्ज दाखल केलेले आहेत. असे सर्व अर्ज यादीमध्ये घेतल्यानंतर यादीतील रुग्णाला माजलगाव मध्ये आज इंजेक्शन पोहोचू शकले नाही. त्यांची दिनांक २१ रोजीची नोंदणी असल्याचे यादीत स्पष्ट नंबर आहे. मात्र इंजेक्शन का पोचले नाही, याबाबत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन उत्तर देऊ शकले नाही. अशाने रुग्ण जर दगावले तर त्याची जिम्मेदारी खरं तर जिल्हा प्रशासनावर आणि जिल्ह्या रुग्णालय अधिकाऱ्यांवर त्यांच्यावर टाकली पाहिजे.

रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यात देखील जिल्हा प्रशासन कमी पडत आहे. कोणतेही नियम पाळले जात नाहीत. या सर्व प्रकाराने आम्ही देखील हतबल झालो आहोत. जर हे कमी झाले नाही तर लोक स्वस्थ बसू शकत नाहीत. कारण ज्यांचे पेशंट दवाखान्यात आहे, त्यांनाच त्याची मानसिकता काय असते आणि त्रास किती असतो, हे समजते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ सुधारणा करावी अन्यथा लोक उग्र रूप धारण करतील, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close