आपला जिल्हा

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी क्षीरसागर यांनी घेतली मंत्र्यांची भेट

बीड — जिल्ह्यासह मराठवाड्यातील आरोग्यविषयक प्रश्नावर आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे अन्न व औषध पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून घ्याव्यात तसेच बीड जिल्ह्याला रेमडेसिव्हर आणि ऑक्सिजन चा पुरवठा आणि आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून घ्याव्यात यासाठी आग्रहाची मागणी केली आजच बीड जिल्ह्यासाठी 900 रेमडेसिव्हर मिळाले असून आणखी 3 हजार इंजेक्शन तातडीने द्यावेत जेणे करून रुग्णांना वेळेत उपयोग होईल असे सांगितले यावेळी,आरोग्य सचिव व्यास, औषध प्रशासनाचे सचिव परविंदर सिंग हापकिनचे प्रमुख रामास्वामी, तसेच वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ आदि उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close