आपला जिल्हा

सुरेश आण्णा नुसता गोंधळ घालून काय फायदा डोईफोडे च जिल्हाधिकाऱ्यां समोर थोबाड फोडलं असतं तर जनतेला आणखी भावल असतं

बीड — मागील दोन दिवसापासून अन्न औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करून देखील रेमडीसिवर इंजेक्शन न मिळाल्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस हे गुरूवारी दुपारी आक्रमक झाले. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या दालनातच इंजेक्शन वरून मोठा गोंधळ झाला जर प्रशासन रुग्णांना इंजेक्शन देणार नसेल व केवळ इंजेक्शन न मिळाल्यामुळे मृत्यू झालेल्या किती लोकांना आम्ही जाळायचं, असा सवालही आ. धस यांनी यावेळी उपस्थित केला.पण आण्णा डोईफोडे सारखा मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या गिधाडाच थोबाड फोडलं असतं तर इंजेक्शन साठी उद्विग्न झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या काळजाला थंडावा तरी मिळाला असता. अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागली आहे.

बीड जिल्ह्यात रेमडीसिवर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. सहा हजाराहून अधिक कोरोना सक्रिय रुग्ण जिल्हयात उपचार घेत आहेत. यातील पाचशे ते सहाशे पेक्षा अधिक रुग्णांना तात्काळ रेमडीसिवर इंजेक्शनची गरज आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी अन्न औषध प्रशासन विभागाकडे इंजेक्शनच्या मागणीची नोंदणी देखील केली होती. मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनची वाट पाहत होते. परंतु त्यांना इंजेक्शन मिळाले नाही. गेल्या पाच-सहा दिवसापासून डोईफोडे करत असलेली रेमडिसिवर इंजेक्शनची काळाबाजारी गाजते आहे. सर्वत्र बोंबाबोंब होऊन देखील जिल्हाधिकार्‍यांनी कुठलीच त्याच्यावर कारवाई केली नाही. परिणामी पेशंटच्या नातेवाईकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. शेवटी या त्रासाचा स्फोट झाला नातेवाईक आक्रमक झाले व स्वतः भाजपचे आ. सुरेश धस हे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या दालनात इंजेक्शन का मिळाले नाही. याची विचारणा करण्यासाठी आले. यादरम्यान अन्न औषध प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले व याबाबत विचारले असता इंजेक्शन उपलब्ध झाले नसल्याची उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली हे ऐकून आमदार धसांनी आक्रमक पवित्रा घेतला व अधिकाऱ्यांना झापले. यावेळी आमदार धस म्हणाले की, आष्टी ते बीड हे 100 किलोमीटरचे अंतर आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन घेण्यासाठी बीड ला बोलावले जाते. हे चुकीचे आहे. आष्टी मध्ये रेमडीसिवर इंजेक्शन उपलब्ध करून द्या, अशी मागणीही यावेळी आमदार धस यांनी केली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा.आयुक्त रामेश्वर डोईफोडे, सहा.आयुक्त सय्यद हाश्मी यांची उपस्थिती होती.

धस साहेब तुम्ही तरी आणखी आक्रमक व्हा !

रेमीडीसीवरच्या काळाबाजारीला जिल्हाधिकारी आळा घालू शकले नाहीत. प्रशासनाची नौका कोरोना लाटेत भरकटली आहे. नौके वरचे सत्ताधारी पक्षाचे नियंत्रण सुटले आहे. जनता आक्रोश करत आहे अशा स्थितीत तुम्ही तरी विरोधी पक्ष म्हणून प्रशासनावर अंकुश ठेवायचं काम करा वेळप्रसंगी मसल पावर चा वापर करा एवढी एकमेव आशा तुमच्याकडून जनता बाळगत आहे. कारण माध्यमांनी ठोकलेली आरोळी प्रशासनाच्या कानावर जायला तयार नाही. जनता त्रस्त होत आहे याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. डोईफोडे सारखा अधिकारी बिनधास्त काळाबाजार करून लूट करत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close