आपला जिल्हा

रेमडीसिवीर वाटपातील सावळा गोंधळ थांबवा –अशोक हिंगे

जिल्हा शल्य चिकित्सक गीते व डोईफोडे यांच्यात ताळमेळ दिसत नाही....

.बीड शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये नोंद आवश्यक त्यानंतर खाजगी मेडिकल मधून वाटप केली जाणार इंजेक्शन

बीड — रेमडिसिवीरच्या संदर्भात जिल्हाधिकारी बीड यांनी एक कमिटीची स्थापना केली व त्यातील सदस्यांची नावे मोबाईल नंबर सहित जाहिर केली पण त्यातील सदस्यांना संपर्क केला असता आम्हा काहीच माहिती नाही अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर दुसर्‍या दिवशी रेमडिसिवीर चा मागणी अर्ज शासकिय रुग्णालय ट्रेंनीग सेंटर येथे देण्यास सांगण्यात आले रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याठिकाणी मागणी अर्ज हि दिले आज परत शासकीय रुग्णालयात रेमडीसिवीर मागणीसाठी औषध निरीक्षक श्री डोईफोडे याच्याशी संपर्क साधावा असा बोर्ड लावण्यात आला नातेवाईक औषध प्रशासन यांच्या आॅफीसला दिवसभर चकरा मागूनही डोईफोडे यांची भेट झाली नाही.त्यांनी रुग्णांच्या नातेवाईंकाचे फोनही उचलत नाहीत नंतर सायंकाळी अशोक हिंगे वंचित बहुजन आघाडी मराठवाडा अध्यक्ष यांनी संपर्क केल्यानंतर इंजेक्शन आली नाहीत ती आल्यानंतर खाजगी मेडिकल स्टोअरमधुन देण्यात येतील तुम्ही शासकिय आय टी आय मधे जाऊन नोंदणी कराअसा सल्ला त्यांनी दिला. पण हेच जर जिल्हा प्रशासनाने वर्तमान पत्रात सोशल मीडियावर जाहिर केले असते तर रुग्णाच्या नातेवाईकांचे हाल झाले नसते. या सर्व प्रकारात जिल्हाधिकारी यांनी लक्ष देवुन हा सावळा गोंधळ थांबवुन रुग्णांना शासनाकडून आलेली इंजेक्शन सोप्या पद्धतीने रुग्णा पर्यंत पोहचवावीत अन्यथा रुग्णांच्या रोषाला सामोर जावे लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंग यांनी दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close