क्राईम

तहसीलदार वमनेंनी झोपा केला, ऑक्सिजन अभावी स्वारातीत अनेकांचा बळी गेला: जिल्हाधिकारी साहेब,वमनेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

बीड — सध्या जिल्ह्यात ऑक्सीजन सिलेंडर अभावी हाहाकार माजला असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात 48 सिलेंडर जमा करण्यात आले होते मात्र हे सिलेंडर अंबाजोगाईला पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या बीडच्या तहसीलदार शिरीष वमनेनी रात्रभर झोपा काढल्या तब्बल आठ तासाच्या कालखंडानंतर सकाळी दहा वाजता सिलेंडर पोहोचवण्यात आले. दरम्यानच्या काळात ऑक्सिजन अभावी स्वा रा ती रुग्णालयात 11 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. या हलगर्जीपणाची चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तहसीलदारां विरोधात दाखल करावा अशी मागणी होऊ लागली आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. मिळेल त्या ठिकाणावरून ऑक्सिजन कसा उपलब्ध होईल यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप रात्रीचा दिवस करत आहेत. रुग्णांची हेळसांड होऊ नये कुणाचा बळी जाऊ नये यासाठी त्यांनी महसूल यंत्रणा कामाला लावली आहे. ऑक्सीजन निर्मिती केंद्रावर महसूल अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस ठाण मांडून बसले आहेत. तलाठी सचिन सानप व इतर कर्मचाऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास औरंगाबाद जालना येथून तब्बल 48 सिलेंडर बीडला आणले ते जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले.अंबाजोगाईच्या स्वा रा ती रुग्णालयाने मंगळवारीच सिलेंडर ची मागणी नोंदविली होती.या सिलेंडर च्या तातडीने वितरणाची जबाबदारी बीड चे तहसीलदार शिरीष वमने यांच्यावर सोपवण्यात आली होती. दरम्यान वाळू उपसा प्रकरणात हप्ता न देणाऱ्या लोकावर जलद गतीने कारवाई करणारे तहसीलदार वमने यांनी मात्र सिलेंडर पोचवण्यात दिरंगाई करत रात्रभर झोपा काढल्या. परिणामी दोन वाजता ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होऊन देखील तब्बल आठ तास जिल्हाधिकारी कार्यालयातच पडून राहिले. सकाळी दहा वाजता नायब तहसीलदार राऊत यांच्या पथकाने हे सिलेंडर ताब्यात घेऊन अंबाजोगाईला पोहोचवले. दरम्यानच्या आठ तासाच्या काळात अंबाजोगाईच्या स्वा या ती रूग्णालयात कोरोना बाधित अकरा रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. मध्यरात्रीनंतर हे बळी गेले. मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. हा आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावला असला तरी वाळूची हप्ते खोरी करण्यात चपळाई दाखविणाऱ्या वमने च्या लेखी रुग्णांचे जीव चिल्लर असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. रुग्णालय प्रशासनाने काहीही खुलासा केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करत. दोषी झोपाळू वमने वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close