क्राईम

मित्राच्या मदतीने भावाने बहिणीचा केला खून

केज — पाडव्यानिमित्त आपल्या आईला भेटायला आलेल्या बहिणीचा मित्राच्या मदतीने भावानेच खून केल्याची घटना बोरगाव येथे मंगळवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ‌
पाडव्याच्या सणानिमित्त बोरगाव येथे पुण्याहून शितल लक्ष्मण चौधरी ही आपल्या मुलीसह आईला भेटायला आली होती.
मात्र तिचा मंगळवारी मध्यरात्री तिचा भाऊ दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा. बोरगाव यांनी अज्ञात कारणावरून बहिणीच्या डोक्यात हत्याराने वार
करून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली.
मयत महिलेचा चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे याने दिलेल्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा. बोरगाव यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या सह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली . या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करत आहेत. दरम्यान भावाने बहिणीचा खून का केला ? हे मात्र स्पष्ट झालेले नाही

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close