महाराष्ट्र

हाहाकार : ऑक्सीजन गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू

नाशिक — पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात टँकरमधून आॉक्सिजन टँकमध्ये भरताना गळती झाली. यामुळे रुग्णालयात पुरवठा सुरु असणाऱ्या ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि ऑक्सिजन अभावी २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळपास १५० रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर, जवळपास ३० ते ३५ जण मृत्यूच्या दाढेत असल्याचा दावा केला जात आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेल्याची घटना आज दुपारी एक वाजता घडली. यावेळी १३१ रुग्ण महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर काही लोकांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.
रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असून रुग्णालयात सध्या १३१ रुग्ण आहेत. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालयातून अतिरिक्त साठा मागवण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन टँकमधून होणारी गळती थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले . ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.
झाकीर हुसेन हॉस्पिटल नाशिक शहरातील सगळ्यात मोठे हॉस्पिटल समजले जाते. या ठिकाणी शहरातील नागरिकांसह, जिल्ह्यातील रुग्णांवरही प्रमाणात उपचार केले जातात. या ठिकाणी सध्या १३१ रुग्ण उपचार घेत होते. १७० बेडचे हे हॉस्पिटल असून त्यामध्ये १७ बेड हे व्हेंटिलेटर असे होते. सहा ते सात लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. नुकतेच दहा सिलेंडर सिव्हिल हॉस्पिटलमधून या रुग्णालयात आणण्यात आले असून तातडीने त्याची जोडणी पूर्ण करण्यात आली आहे.
२२ रुग्णांचा मृत्यू
रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीला मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याने दुर्दैवाने या घटनेमुळे कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या बाबत माहिती दिली आहे. तसेच, मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
३० ते ३५ रुग्ण दगावण्याची भीती
झाकीर हुसेन रुग्णालयाच्या व्हेंटिलेटर कक्षामध्ये किंवा ऑक्सिजन सुरु असलेल्या रुग्णांची संख्या साधारण ६१ इतकी होती. यातील तीस ते पस्तीस दगावतील अशी भीती, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केली आहे. ज्या कंपनीने ऑक्सिजन प्लांट येथे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, आणि नुकसानभरपाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान या दुर्घटनेमुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close