आरोग्य व शिक्षण

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची सैनिकी विद्यालयात व्यवस्था

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा प्रशासनाला मदतीसाठी पुढाकार

बीड —- कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची राहणे व उपचारासाठी सैनिकी विद्यालय येथे व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या करीता माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन सैनिकी विद्यालयाची इमारत उपलब्ध करुन दिली आहे. यापूर्वी गतवर्षी २०० ऊसतोड कामगारांना १५ दिवस राहण्यासाठी याच ठिकाणी जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनी सोय करुन या आपत्कालीन स्थीतीमध्ये सामाजिक बांधिलकी जपली होती.

कोरोनाची दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत आहे. या करीता विविध सामाजिक संस्था , व्यक्ती पुढाकार घेत आहेत. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही पुढाकार घेऊन सैनिकी विद्यालयाची इमारत प्रशासनाला उपलब्ध करुन दिली आहे. या ठिकाणी कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची व्यवस्था सैनिकी विद्यालयाची वस्तीगृह इमारत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घेतला आहे. या पुर्वी गतवर्षी देखील जवळपास २०० ऊसतोड मजुरांची व्यवस्था सैनिकी विद्यालयात करण्यात आली होती, अशी माहिती प्राचार्य डाके एस ए यांनी दिली आहे.

सैनिकी विद्यालय बीड येथे माजीमंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या सूचनेवरून निवास , लाईट, पाण्याची व्यवस्था केली आहे. राजकारणा पलीकडे सामाजिक बांधिलकी जोपासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर जनसेवेसाठी पुढे आले आहेत. या संकटाच्या परिस्थितीमध्ये नवगण शिक्षण संस्था राजुरी या आपल्या संस्थेअंतर्गत सैनिकी विद्यालय बीड येथे आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजू मचाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डाके एस ए यांनी आपल्या वरिष्ठांच्या सूचनेवरून कार्यवाही सुरु केली आहे.
सैनिकी शाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व एस. डी. ओ. टिळेकर, यांनी भेट देऊन संपूर्ण शाळेची पाहणी केली, यावेळी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य डाके एस. ए. यांनी अधिकार्यांचे स्वागत करुन संपुर्ण सुविधांची माहिती दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close