आरोग्य व शिक्षण

coronavirus : बीड जिल्हा आजही @1121

बीड — जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले असले तरी नियमांचे पालन होत नसल्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तूटायला तयार नाही. 4242 जणांच्या अहवालामध्ये 1121 जन पॉझिटिव आले आहेत. अंबाजोगाई चा आकडा आजही 212 वरच अडकला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागामध्ये कोरोना संक्रमणाने आपले हात पाय पसरल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
अंबाजोगाई तालुक्याचा आकडा आजही 200 च्या घरात राहिला 212 रुग्ण तालुक्यात आढळले तर आष्टी तालुक्यामध्ये हा आकडा 200 च्या जवळपास जाऊन पोहोचला. 198 रुग्ण या ठिकाणी सापडले. बीड तालुक्यामध्ये 161 धारूर मध्ये 57 गेवराई मध्ये 101 तर केज मध्ये 87 रुग्ण आढळले आहेत. माजलगाव मध्ये 64 रुग्ण सापडले असून परळी मध्ये हाच आकडा सव्वाशे वर जाऊन पोहोचला आहे. पाटोदा सारख्या ग्रामीण भागात देखील 51 संख्या गाठली असून 37 रुग्णसंख्या शिरूर तालुक्यात आढळली आहे. वडवणी मध्ये 28 ही सर्वात कमी रुग्ण संख्या असलेला तालुका आजच्या अहवालामध्ये आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close