महाराष्ट्र

कोरोना रुग्णांचा मृतदेह अंत्यविधीसाठी दिला नातेवाईकांच्या ताब्यात

बीड — जिल्हा शल्य चिकित्सक म्हणुन डॉक्टर गीतेंनी कारभार स्वीकारला अन् तात्काळ कोरोना संकट देखील वाढले. यात त्यांच्या कार्यशैली च्या अब्रूचे धिंडवडे निघू लागले. राजकीय वरदहस्त लाभलेल्या व बेफिकीर प्रवृत्ती असलेल्या या व्यक्तिमत्वा कडून नवनवीन प्रताप घडू लागले आहेत. पॉझिटिव्ह नसलेल्या व्यक्तीला दोन दिवस कोरोना वार्डात ठेवल्याची घटना घडल्यानंतर

धनु भाऊ गीतेंना वेळीच आळा घाला.

‘टीका ही होतच असते तिच्याकडे दुर्लक्ष करायचे असते ‘ या आपल्या एका वाक्याने डॉक्टर गीते यांचा आपल्या डोक्यावर वरदहस्त आहे. आपलं कोणीच वाकडे करू शकणार नाही असा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी त्यांनी रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु केला आहे. याबरोबरच कोविडसारख्या  महामारीत त्यात आणखी भर पडली आहे. रुग्णां सोबतच त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाशी खेळ देखील सुरू केला आहे. covid-19 वार्डात सहज सामान्यांना देखील प्रवेश दिला जात आहे. हा अनागोंदीचा कारभार जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. राज्याच्या राजकारणात आपल्याला याचे उत्तर द्यायचे आहे गीते हा दर महिन्याला मिळणाऱ्या पगारी चा मालक आहे. आपल्या राजकारणाला गितेंनी बदनाम करण्यापूर्वी याला वेळीच आळा घाला अन्यथा एक दिवस तुम्ही कमावलेली इज्जत मानसन्मान डॉक्टर गीते धुळीला मिसळल्या राहणार नसल्याची प्रतिक्रिया तुमच्या चाहत्यातून व्यक्त केली जात आहे.

आता तर चक्क कोरोना पॉझिटिव असलेला रुग्ण मृत्यू झाल्यानंतर तो मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.तसेच दुसऱ्या दिवशी मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची खबर त्यांना देऊन काळजी घेण्याचा सल्ला दिला. एकंदरच डॉक्टर गीतें कडून च कोरोना आजाराला खतपाणी घालण्याचं काम केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कोरोणा पॉझिटिव वॉर्डातमध्ये गेल्या आठवड्यात बीडच्या सरकारी दवाखान्यात एक महिला रुग्ण ऍडमिट करून घेण्यात आली होती. हा रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याची खबर वॉर्डातील लोकांना नव्हती. त्यामुळे हा रुग्ण निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह हे समजण्या आधीच त्याची ट्रीटमेंट चालू केली. दरम्यान उपचार सुरू असताना या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी वेगळा कक्ष करण्यात आला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांचा अंत्यविधी प्रशासना मार्फत केला जातो. मृतदेह किटमध्ये गुंडाळून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. मात्र गीतेच्या बेफिकीर कारभारामुळे सगळी यंत्रणाच कोलमडून गेली आहे. ” ढवळ्या जवळ पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला ” अशी स्थिती निर्माण झाली यंत्रणेलाही या गुणांची लागण झाली. परिणामी कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन अंत्यविधी करण्यास सांगितले.नातेवाइकांनी रीती रिवाजाप्रमाणे संध्याकाळी अंत्यविधी उरकला. आणि सदरचा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची बाब लक्षात येताच दुसऱ्या दिवशी सकाळी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मृताच्या नातेवाईकांना भेटायला जाऊन त्यांनी सदरचा रुग्ण पॉझिटिव्ह होता, हे सांगितले. एवढ्यावरच हे सत्र थांबलं नाही तर रुग्णांच्या नातेवाईकांनी काळजी घ्यावी, रुग्ण कोरोना पॉझिटिव होता, ही बाब देखील त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या उपचाराबाबत प्रचंड वाद निर्माण झाला असून रुग्णांचे हाल होत आहेत. रेमडेसीविर इंजेक्शन वेळेवर भेटत नाहीत. त्याचप्रमाणे ऍडमिट झालेल्या रुग्णांना सेवा देखील वेळेवर मिळत नाहीत. या सर्व बाबी वारंवार समोर येत असतानाही जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व अन्य यंत्रणा सूस्त का आहे ? हे कळायला मार्ग नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांच्या कार्यकाळात सर्व निर्लज्ज पणाच्या मर्यादा ओलांडत रुग्णांच्या जीविताशी खेळ खेळला जात आहे एक प्रकारे आरोग्य विभागच कोरोना महामारी ला खतपाणी घालत असल्याचं चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
————————————–
शल्य चिकित्सक यांना एक बैठक लावून चाललेल्या काळ्या बाजाराला रोखण्यासाठी काय भूमिका असावी, या बाबत आमचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी आम्ही केली असता ते अंगाला कासरा लागु द्यायला तयार नाहीत. आम्ही रुग्ण सेवेसाठी झटत असताना हे वागणे बरोबर नाही. कोरोना रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासन जर तात्काळ सुधारले नाही, तर या प्रशासनाची विभागीय आयुक्तांकडे बैठक लावून डोळे उघडण्यासाठी कारवाई करावी लागेल. दुर्दैवाने सरकारी दवाखान्याचे आरोग्य प्रशासन ना-लायक ठरत असल्याचे म्हणावे लागतं आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाला देखील या बाबी कळवाव्या लागतील
                       —- अँड अजित देशमुख

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close