क्राईम

रेमडिसिव्हरची लाईफ लाईन हॉस्पिटल मधील मेडिकल मध्ये जास्त दराने विक्री; पोलिसात तक्रार दाखल

बीड – जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय होते आहे. अशा स्थितीत शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकल वर हे इंजेक्शन 5400 रुपयांना विक्री केले जात असल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल झाली असून पोलिस याप्रकरणी चौकशी करत आहेत.तर अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील औषध निरीक्षक डोईफोडे हे पोलीस ठाण्यात काहीवेळ थांबून नंतर तेथून निघून गेले .

 

राज्यात रेमडिसिव्हीर इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झालेला असताना काही लोक या इंजेक्शन चा काळाबाजार करत आहेत .कोविड केयर सेंटर असलेल्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिकल आहेत त्यांना हे इंजेक्शन विक्रीची ते ही एम आर पी ऐवजी किमान 1400 रुपयांना विक्री करण्याचे आदेश आहेत .

बीड जिल्ह्यात या इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत .या तक्रारी कमी व्हाव्यात म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी टास्क फोर्स ची स्थापना केली आहे .मात्र तरीही काही लोक काळाबाजार करीत आहेत .

बीड शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकल वर हे इंजेक्शन 5400 रुपयांना विक्री होत असताना रुग्णाच्या नातेवाईकांनी रंगेहाथ पकडले .त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टर, मेडिकल चालक,तक्रारदार यांनी गर्दी केली होती .

लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये हा जो प्रकार झाला आहे तो गंभीर आहे .या प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन संबंधित मेडिकल आणि हॉस्पिटल कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. अन्न औषधी प्रशासन विभाग आता निरीक्षक डोईफोडे या सर्व काळाबाजारीला खतपाणी घालत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close