क्राईम

भरधाव कारने दोन दुचाकींना ठोकरले; पांढरीजवळील अपघातात तरुण जागीच ठार, तीन गंभीर जखमी

आष्टी — भरधाव वेगाने कारने च वाहनाने दोन दुचाकींना समोरासमोर जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक तरूण जागीच ठार झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. गुरूवार दि. 15 एप्रिल ला दुपारी साडेतीनच्या सुमारास नगर ते बीड महामार्गावर पांढरी गावाजवळ हा अपघात झाला. जखमींवर आष्टीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर जामखेडकडून नगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने (क्रमांक एम. एच. १२ क्यू. टी. ७८४८ ) या वाहनाने दोन दुचाकीस्वारांना समोरासमोर जोराची धडक दिली.

या अपघातात पांढरी येथील पोपट छगन शिंदे (वय – ३२ वर्षे) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील गणेश काळे, जयश्री गणेश काळे, एक लहान मूल (तिघे रा. जामखेडमध्ये) हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलास हवालदार.सचिन कोळेकर यांनी धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close