महाराष्ट्र

श्मामला कालकुंद्रीकर यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे निधन

आष्टी — शहरातील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर देवस्थानच्या प्रमुख श्रीमती श्यामला रघुनाथ कालकुंद्रीकर यांचे वृद्धापकाळाने गुरुवार दि 15 एप्रिल रोजी दुपारी पुणे येथे निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या. अत्यंत मितभाषी, शांत आणि सर्वांशी आपुलकी असणाऱ्या “गुरु वहिनी” म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या पश्चात सून, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

आष्टी शहरातील दत्त मंदिर प्रसिद्ध असून, येथे शिवदत्ताची दुर्मीळ मूर्ती आहे. ब्रह्मलीन सदॆगुरू रघुनाथ महाराज कालकुंद्रीकर यांनी या मंदिराची ग्रामस्थांच्या सहकार्याने स्थापना केली. महाराजांचा शिष्यवर्ग सर्वत्र आहे. त्यांच्यानंतर गेल्या सुमारे पंचवीस वर्षांपासून या देवस्थानची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत गुरुवहिनी साहेबांनी दत्तसेवा केली. त्रिकाल आरती होणारे हे तालुक्यातील एकमेव देवस्थान आहे. याशिवाय विविध उत्सवही या ठिकाणी पार पडतात. नुकतेच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. गुरुवहिनींच्या इच्छेप्रमाणे दत्तमंदिरातील रघुनाथ महाराजांच्या समाधीशेजारी अंत्यविधी पार पडणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close