आरोग्य व शिक्षण

जिल्ह्यात २ हजार १२ विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेतील मोफत प्रवेशासाठी निवड 

बोगस प्रवेश रोखण्याचे पडताळणी समती पुढे आव्हान.

बोगस प्रवेश आढळल्यास पालक व पडताळणी समितीची शिक्षण संचालकांकडे तक्रार करणार — मनोज जाधव

बीड —- जिल्ह्यात खासगी विनाअनुदानित इंग्रजी शाळांमधील आरटीई अंतर्गत मोफत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची लॉटरी पद्धतीने सोडत दी. ७ एप्रिल रोजी करण्यात आली. काल १५ एप्रिल रोजी पासून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. मात्र पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता प्रवेशाच्या वेबसाईटवर जाऊन प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ मध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव मोफत प्रवेशासाठी बीड जिल्ह्यात २३३ पात्र शाळांमधे ३ हजार ९३८ इतके ऑनलाईन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार १२ विद्यार्थ्याची निवड ही मोफत प्रवेशासाठी झाली असून ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यांच्या पालकांनी आरटीई पोर्टल वर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. जाताना आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये. तसेच दिलेल्या मुदतीतच प्रवेश घ्यावा मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कारणामुळे पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नसेल त्यांनी समितीशी संपर्क करून whats app /email किंवा अन्य माध्यमांच्या द्वारे बालकाच्या प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. मात्र कोरोना विषाणूच्या प्रदूर्भवामुळे पडताळणी समितीकडे प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. असे आवाहन देखील आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.

बोगस प्रवेश रोखण्याचे पडताळणी समिती पुढे आव्हान.

आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक नामी शक्कल लढवत खोट्या कागदपत्रांच्या आधारे गोरगरिबांच्या प्रवेशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः नोकरदार आणि मोठे व्यापारी यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. हे बोगस प्रवेश रोखण्याचे मोठे आव्हान पडताळणी समितीकडे आहे तसेच बोगस गॅस बुक, आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड आणि भाडे पत्रक याची कसून चौकशी करणे गरजेचे आहे. या मध्ये पालक किंवा पडताळणी समितीचे कर्मचारी दोषी आढळल्यास शिक्षण संचालकांकडे तक्रार करणार असल्याचे मनोज जाधव यांनी म्हंटले आहे.

पालकांसाठी सूचना

1) पालकांनी फक्त sms वर अवलंबून राहू नये .
2) पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती
b. आरटीई पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे.
3) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे. त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे. location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास किंवा त्या ठिकाणचा रहिवासी पुरावा नसल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
4) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.
5)प्रतिक्षा यादीतील (waiting list )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये . त्यांच्या करिता rte पोर्टल वर स्वतंत्र सूचना दिल्या जातील

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close