आपला जिल्हा

जिल्ह्यात लॉकडाऊन असताना खासदार ताईंनी दौऱ्याचे स्टंट करण्यापेक्षा केंद्राकडे लस, रेमडीसीविर मागावेत

खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या कोविड दौऱ्यावरून नाराजीचा सूर…

बीड —-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बीड जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन असताना कोविड रुग्णालयांना भेटी देण्यासाठी दौरे करायचे स्टंट करण्याऐवजी केंद्रात सत्तेत असलेल्या त्यांच्या पक्षाच्या सरकारकडे जिल्ह्यासाठी अधिकच्या लसींचा व रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी मागणी करावी अशी चर्चा होत आहे.

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत कोविड विषयक आढावा व उपाययोजनांसाठी १६ पेक्षा अधिक बैठका घेतल्या; मात्र यांपैकी एकाही बैठकीला खासदार ताई उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या या उदासीन धोरणाबद्दल जिल्ह्यात नाराजीचा सूर आहे.

लाखोंच्या मतांनी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे या आज दि. १४ एप्रिल पासून १६ एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना भेटी देऊन ठिकठिकाणचा आढावा घेणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर ताईंनी लॉकडाऊनच्या काळात गर्दीला निमंत्रण देणारे हे उशिरा सुचलेले शहाणपण टाळावे व आपली शक्ती रुग्ण व्यवस्थापन करणे, आवश्यक सुविधा मिळवण्यासाठी केंद्र सरकार कडे मागणी करणे यासाठी खर्च करावी असा सल्लाही काही नेटकऱ्यांनी दिला आहे.

केंद्राकडून बीड जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या व्हेंटिलेटर्स पैकी बरेच व्हेंटिलेटर्स बंद पडले असल्याच्या देखील तक्रारी आहेत, रुग्णालयांचे गर्दीला निमंत्रण देणारे दौरे करून, प्रशासनाला व्यवस्थापन करण्यात अडथळा निर्माण करण्याऐवजी खासदार ताईंनी बिघडलेले व्हेंटिलेटर्स दुरुस्त करून किंवा बदलून मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा चर्चा देखील सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close