आपला जिल्हा

माजलगांव मध्ये तेल पँकीग युनिटला आग

माजलगांव — शहरापासून जवळ असलेल्या फुले पिंपळगाव येथील नवीन मोंढ्यातील तेल पॅकिंग करणाऱ्या युनिटला आज गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या बाबत माहिती अशी की, नवीन मोंढ्यात महावीर ट्रेडिंग कम्पनी ही संतोष अब्बड यांच्या मालकीची तेल कम्पनी आहे. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी अचानक लागलेल्या आगीत पॅकिंग साहित्य व खाद्यतेल जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी सोळंके साखर कारखाना, माजलगाव नगर परिषद, गेवराई नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले होते. तर व्यापारी बांधवांनी देखील शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल चार तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close