आपला जिल्हा

नाक कापलं तरी दोन‌भोकं तयार अगदी असाच आहे राजा रामा स्वामींचा कारभार

बीड — जिल्ह्यात बनावट दारू, मटका, पत्त्याचे क्लब, अवैध वाळू उपसा, चौसाळा चेक पोस्टवर पोलिसांकडून होणारी लूटमार यासारख्या घटनांची बोंब प्रसिद्धीमाध्यमांनी मारली यातून पोलीस यंत्रणेच्या इज्जतिची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत. याचं कुठलंच वैशम्य राजा रामा स्वामींना लक्ष्मी दर्शना पुढे नसल्यामुळे कुठलीच कारवाई त्यांच्याकडून केली जात नाही परिणामी हा प्रकार म्हणजे नाक कापलं तरी दोन भोकं तयार असं म्हणणारा कारभार राजा रामा स्वामींचा सुरू झाला आहे.
जिल्ह्यात नंबर दोनच्या धंद्यांना ऊत आलेला आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्री, बनावट दारू, मटका पत्त्याचे क्लब यासारखे व्यवसाय राजरोस सुरू आहेत. पोलिसांना पैसा कमी पडायला लागला म्हणून वाळू उपसा देखील मोठ्या प्रमाणावर केला जात असला तरी याला संबंधित ठाणे प्रमुखाकडूनच प्रोत्साहन मिळत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्यात करोडो रुपयांची उलाढाल होताना दिसून येत आहे. प्रसिद्धी माध्यम या सर्व घटनांची माहिती माध्यमातून देत असले तरीही पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सर्व सुरू असल्यामुळे आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकाही पोलिस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यावर राजा रामा स्वामींनी केली नाही. कारण त्यांचा मेहुणी बायको मिंधा संसार अशी अवस्था झाली आहे. चौसाळा सारख्या चेक पोस्टवर उघड उघड जिल्ह्यात येणाऱ्या वाहनावर पोलीसांकडून दरोडा टाकला जात असला तरी राजा रामा स्वामींना याच्याशी काहीच देणेघेणे नाही. उलट प्रसिद्धीमाध्यमांनी एखादी बातमी छापली तर पोलिस अधीक्षकांच्या खिशात हप्त्याच्या स्वरूपातून अधिकची भर पडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चौसाळा चेक पोस्टवर वाहनांना थांबवून कागदपत्रांची तपासणी करण्याचा नाटक केल्या जातं. हजार-दोन हजार रुपयांची मागणी चालकाकडे केली जाते. वाहन चालकांचा मानसिक छळ केला जात असताना दुसरीकडे ट्रक टेम्पो मधील माल गायब केला जातो.पूढे गेल्यावर ही बाब वाहन चालकाच्या लक्षात येते. वाहन चालक पोलीस ठाण्यात गेलाच तर त्याला ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली तिकडेच तक्रार करा असं सांगत हाकलून दिलं जातं तर वाशी पोलिस देखील चौसाळा चेक पोस्टवर ही घटना घडल्यामुळे हा विषय आमच्या हद्दीतील नाही असं सांगत वाहन चालकाला बेरंग वापस पाठवतात. परिणामी वाहन चालक पोलीस ठाण्याचा नाद सोडून देतात.
चौसाळा चेकपोस्ट वर होत असलेल्या लूटीची बातमी वाचून राजा रामा स्वामींचा खिसा जास्त गरम व नेकनूर पोलिसांचा जास्तीचा चट्टा निघणार आहे हे जरी खरं असलं तरी याप्रकरणात देखील राजा रामा स्वामी कारवाई करणार नाहीत हे जरी सत्य असलं तरी माध्यमांना त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.
सध्या प्रत्येक पोलिस ठाण्यात अवैध धंद्यांना प्रोत्साहन देण्याची चढाओढ लागल्याचे पहावयास मिळत आहे परिणामी सध्या कडक लॉक डाउन असतानादेखील नेकनूरचे पी आय केंद्रे गस्त घालत असताना देखील बनावट दारू चौसाळा मध्ये राजरोस विक्री केली जात आहे. ही डोळेझाक उगाच केली जात नाही जनता बोळ्याने दूध पीत नाही. हीच अवस्था महामार्गावर असलेल्या प्रत्येक धाब्यांची आहे. मागच्या दाराने तेथेदेखील दारू विक्री जोरात सुरू आहे. एस पी साहेब तुम्ही देशाच्या नावाखाली स्वतःच्या अर्थ चक्राला गती देण्याचे काम करत असला तरी गरिबांची कुटुंब मात्र उध्वस्त होत आहेत. कोरोना सारखी महामारी ब्रह्मराक्षसाच रूप धारण करत जनतेला गिळू पाहत आहे पण अशा राष्ट्रीय संकटात (गटार ) गंगेत हात धुवून घेणे तुमच्या नैतिकतेला पटत असेल पण तिथे जनतेचा जीव धोक्यात आला आहे त्याचं काय ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. एस पी साहेब जिल्ह्याचा कारभार तुमच्या कारकीर्दीत एवढा चांगला चालू आहे की हागणारालाही लाज नाही बघणाऱ्याला तर नाहीच नाही आशी स्थिती तुम्ही करून ठेवली आहे. कुठपर्यंत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जाणार आहेत बीडच्या इतिहासात आतापर्यंत पोलीस यंत्रणेची लक्तरं वेशीवर टांगली गेली नव्हती. ती आता टांगण्याच काम आपण करत आहात असं म्हणायची देखील आता लाज वाटू लागली आहे. कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती अवैध धंदे, कोणत पोलीस ठाण जास्त हप्ता देतं यासाठी नव्या एखाद्या मेडल ची घोषणा तरी लवकर करा. निदान प्रसिद्धी माध्यम रोजच उठलं की अवैध धंद्यांच्या बातम्या प्रसिद्ध करतं किमान त्याला तरी आळा बसेल. जिल्ह्यातील जनतेची थोबाड तरी बंद होतील. पोलिस यंत्रणेवर आरोप तरी कोणीही करणार नाही. नाक कापले तरी दोन भोक तयार असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. नाक कापून दुसऱ्याला अवलक्षण करण्याची गरज देखील आपल्याला भासणार नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close