आपला जिल्हा

लॉकडाऊन विरोधी संघर्ष समिती सोबत जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा; व्यापारी, व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करावे – जिल्हाधिकारी

बीड —  09 एप्रिल 2021 रोजी लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीने 09 एप्रिलला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कोरोनाचे सर्व नियम व अटी लावून सर्व दुकानदारांना दुकान सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मागणी करण्यात आली होती, अन्यथा मंगळवारी आम्ही दुकाने सुरू करू असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप साहेबानी लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीसोबत चर्चा करून लॉकडाऊन बाबत राज्य सरकार विचारविनिमय करत आहे. व्यापाऱ्यांच्या सर्व भावना शासनास कळवल्या आहेत. तेव्हा ‘लॉकडाऊन संघर्ष समितीने दि 15 एप्रिल पर्यंत संयमाची भूमिका घेऊन अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने न उघडता प्रशासनास सहकार्य करावे, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घ्यावी. तेव्हा जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने ठरवलेल्या नियमाप्रमाणे सहकार्य करावे. जिल्हाधिकाऱ्यांसह विधानपरिषद आ संजय दौंड हे देखील उपस्थित होते. यावेळी लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीचे अशोक हिंगे, शफिक भाऊ शेख, अशोक येडे, भास्कर गायकवाड, धनंजय गुंदेकर, सय्यद सादेक, फय्याज कुरेशी आदींसह लॉकडाऊन संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close