आरोग्य व शिक्षण

विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे: दहावी, बारावी परिक्षा लांबणीवर

मुंबई — महाराष्ट्रातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता दहावी व बारावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 12 एप्रिल रोजी केली. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहेत, तर दहावीच्या परीक्षा जूनमध्ये होतील. सद्यस्थिती परीक्षांचे आयोजन करण्यास अनुकूल नसून आपले आरोग्य आमचे प्राधान्य असल्याचं मंत्री गायकवाड म्हणाल्या.

यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहेत, तर दहावीच्या परीक्षा जूनमध्ये होतील. आम्ही आरोग्याच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यानुसार या परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा केली जाईल.

वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक क्षेत्रांमधील दिग्गजांशी यासंदर्भात सल्लामसलत केली आहे. यानंतरच आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत. आमच्या या निर्णयास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंजुरी दिली आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
सल्लामसलत दरम्यान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भविष्य लक्षात घेऊन विविध वैकल्पिक मूल्यांकन पर्यायांचे मूल्यांकन केले गेले. परीक्षा पुढे ढकलणे हा सर्वात व्यावहारिक उपाय असल्याचे दिसून आले. आम्ही सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्डांना पत्र लिहून त्यांच्या परीक्षेच्या तारखांवर पुनर्विचार करण्याची विनंती करत आहोत, असेही मंत्री गायकवाड म्हणाल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close