आरोग्य व शिक्षण

बीडकर आता तरी सावर, कोरोना रुग्णसंख्या पोहोचली हजारांवर

बीड — जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येमध्ये प्रचंड वाढ होत आहे. रविवारच्या आकडेवारीने तर आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे. जिल्ह्यात अद्यापही नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे रुग्ण संख्या हजारी पार म्हणजेच 1062 वर जाऊन पोहोचली आहे.
बीड जिल्ह्यात निर्बंध कडक केले गेले असले तरी त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नसल्या कारणाने साखळी तोडणे अशक्य होऊ लागले आहे. कडक लाॅक डाऊनची चर्चा जोर धरत असताना बीडची परिस्थितीदेखील हाताबाहेर जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 5681 जणांच्या अहवालामध्ये चार हजार सहाशे एकोणीस जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 1026 रुग्ण नव्याने सापडले आहेत. अंबाजोगाई तालुका व बीड तालुका पूर्वीपासूनच अग्रेसर राहिले आहेत अंबाजोगाई मध्ये आज 223 रुग्ण आढळले आहेत.यामध्ये स्वाराती रुग्णालयातील 16 कर्मचाऱ्यांना देखील कोरोणाची लागण झाली आहे. लॉक डाऊनला सर्वाधिक विरोध करणाऱ्या सुरेश धस यांच्या मतदार संघात देखील कोरोना ने हात पाय पसरले आहेत. आष्टी तालुक्यामध्ये रुग्ण संख्या 200 च्या घरात म्हणजेच 193 वर जाऊन पोहोचली आहे. पाटोदा मध्ये हीच संख्या 53 वर गेली आहे. नेहमीच अग्रेसर असलेल्या बीड तालुक्याने आजही आपले स्थान कायम ठेवले असून रुग्णसंख्या 220 वर जाऊन पोहोचली आहे. धारूर तालुका तीस वर आहे तर सर्वात कमी रुग्ण संख्या वडवणी तालुक्यात 19 पर्यंत आहे. गेवराई तालुक्यामध्ये 64 रुग्ण तर के जत तालुक्यामध्ये एकशे सहा रुग्ण सापडले आहेत माजलगाव मध्ये 34 परळी मध्ये 75 शिरूर मध्ये 45 रुग्ण संख्या आढळली आहे. अजुनही वेळ गेली नाही नियमांचे पालन केले गेले तर या महा मारीला आटोक्यात आणण्यात यश मिळण्यास वेळ लागणार नाही त्यामुळे बीड करांनो सावध व्हा काळजी घ्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close