आपला जिल्हा

जिल्ह्यात आरटीईच्या २ हजार २२१ जागांसाठी ४ हजारांच्या जवळपास अर्ज

पुढील आठवड्यात लॉटरी होणार – मनोज जाधव

बीड —-  शिक्षण हक्क कायदा ( आरटीई ) अंतर्गत खासगी विनअनुदानित इंग्रजी शाळांत राखीव असणाऱ्या २५ टक्के मोफत जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी येत्या ६ एप्रिलला जाहीर होण्याची शक्यता आहे . प्रवेशाची लॉटरी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती आरटीई कार्यकर्ते तथा शिवसंग्रामचे युवा नेते मनोज जाधव यांनी दिली आहे .
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मंगळवार दि . ३० मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. यात राज्यातील एकूण ९ हजार ४३२ पात्र शाळेत ९६ हजार ६८४ जागांसाठी २ लाख २३ हजार ६१ पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरले आहेत . तर बीड जिल्हयात २३३ पात्र शाळेत २ हजार २२१ जागांसाठी ३ हजार ९४३ अर्ज दाखल केले आहेत.
नोंदणीची मुदत संपल्यावर आता ६ एप्रिलला प्रवेशाची लॉटरी काढण्याचे निश्चित होत आहे . त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ३ एप्रिलपर्यंत ‘ डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह ‘ करण्याचे काम पूर्ण करावे . ३ एप्रिलनंतर फॉर्म रिमूव्ह करता येणार नाहीत , अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत . त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे .

चौकट-

बीड जिह्यातील आरटीई अंतर्गत तालुका निहाय प्रवेशासाठी पात्र शाळा, प्रवेशासाठी मोफत राखीव जागा व पालकांनी दाखल केलेले अर्ज यांची आकडेवारी खालील प्रमाणे.

तालुका. आरटीई पात्र शाळा मोफत राखीव जागा  दाखल अर्ज
१)आंबेजोगाई :- ३७ ३१५ ६४४
२)आष्टी :- १४ ५१ ४०
३)बीड +
(बीड शहर) :- ३८ ४५७ ९१७
४)धारूर :- ८ ११४ १०८
५)गेवराई :- ३६ ३६२ ६१६
६)केज :- २१ १९८ २९४
७)माजलगाव :- २९ २३४ ४३२
८)परळी :- २९ ३१५ ७०५
९)पाटोदा :- ४ २० ३३
१०शिरूर :- १० ६९ ८४
११)वडवणी :- ७ ८६ ७०

एकूण :- २३३ २२२१ ३९४३

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close