आपला जिल्हा

चिंता कायम ! कोरोना रुग्णसंख्या 386 वर

बीड — सोमवारी पून्हा कोरोना रूग्णांचा आकडा वाढला आहे.2209 जणांच्या अहवालात 386 जण पाॅजिटिव सापडले आहेत.लाॅकडाऊनचा फायदा बीड व अंबाजोगाई येथील संख्या कमी झालीच नाही.बीड तालुक्याचा आकडा पावणे दोनशेच्या घरात गेला असल्याने चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यात लाॅकडाऊन कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यात अजून तरी यशस्वी झाली नसल्याचं अहवालावरून स्पष्ट होत आहे.रुग्णांची संख्या चारशेच्या घरात पोहोचल्यामुळे अद्यापही चिंता कायम आहे.अंबाजोगाई तालुक्यामध्ये 75 आष्टी तालुक्यात 41 तर बीड तालुक्यामध्ये सर्वाधिक 172 रुग्ण सापडले आहेत. धारूर तालुक्यात अद्याप कोरोना ने जास्त हात पाय न पसरल्यामुळे रुग्ण संख्या नऊवर आहे तर गेवराई मध्ये तेरा केज मध्ये 9, माजलगाव मध्ये 14 परळी मध्ये 29 तर पाटोदा मध्ये 11 रुग्ण सापडले आहेत. तर सर्वात कमी रुग्ण संख्या शिरूर आणि वडवणी तालुक्यात आहे. शिरूर मध्ये सहा तर वडवणीत 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close