क्राईम

लॉक डाऊन मध्ये राजा रामा स्वामींची वाळू उपशा सोबतच दारू गुटख्यालाही परवानगी ? जनता उपाशी वाळू माफिया एसपी तूपाशी

बीड — जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी लॉक डाउन लावण्यात आले आहे. छोटा व्यापारी, रिक्षावाले, मजुर, हॉटेल वाले, टपरीवाले हात गाड्यावर पोट भरणारे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे पण एसपी साहेब तुमच्या परवानगीने वाळू उपसा, दारू विक्री, गुटखा विक्री राजरोस सुरू आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टी उघड्या डोळ्याने पाहू नये यासाठी तैनात असलेला पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर माणसाला फिरकू देत नाही.

या छायाचित्रात दिसत असलेली गर्दी वाळू उपसा करत पोलीस यंत्रणेच श्राद्ध घालण्यासाठी जमलेली दिसत आहे

या छायाचित्रात दिसत असलेली गर्दी वाळू उपसा करत पोलीस यंत्रणेच श्राद्ध घालण्यासाठी जमलेली दिसत आहे

निर्मनुष्य रस्त्यावर सध्या तुमच्या वाळू माफियांचेच राज्य आहे. तुम्ही मात्र जिल्ह्याला अवैध धंद्यांचे नंदनवन बनवले आहे. तुमचे पथक आम्ही खूप कार्यक्षम आहोत आम्ही कारवाया करतो. असं दाखवत एरवी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. वास्तविक तुमच्या पथकाच्या कारवायांचा आटापिटा हा हप्त्याची(खंडणी) मोठी रक्कम वसूल करण्यासाठी असल्याचं स्पष्ट होत आहे. तसं नसतं तर पिंपळनेर मधला वाळूउपसा कधीचाच बंद पडला असता. तो छायाचित्रात दिसत असल्या सारखा राजरोस सुरू राहिला नसता. या प्रकारामुळे जनतेच्या मनात पोलीस यंत्रणे विरोधात रोष निर्माण होत आहे. स्व. गोपीनाथ मुंडेंचा व धनंजय मुंडेंचा जिल्हा तुमच्यामुळे बदनाम होत आहे.


बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी दहा दिवसांसाठी लाॅक डाऊन जाहीर केला. या आदेशाची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

रस्त्यावर चिटपाखरू देखील दिवसभर दिसत नाही. रस्त्यावर पोलिसांच्या गाडी शिवाय वाळूचे टिप्पर,वाळूचे ट्रॅक्टर यांच्याशिवाय दुसरे वाहन दिसत नाही. दारू विक्री करणारे धाबे, हॉटेल, टपऱ्या मागच्या दरवाजाने राजरोस सुरू आहेत. पिंपळनेर परिसरात असलेल्या सिंदफना नदीपात्रात वाळूमाफियांची जत्रा भरली आहे. शेकडो वाहनामधून वाळू जिल्ह्यात राजरोस पाठवली जात आहे. याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला जनतेकडून दिली जात आहे. पण आडनावातच हजारे असलेल्यांचा विलासी जबाब तयार असतो.आम्हाला नूसत पिंपळनेरकडच लक्ष देवून चालत नाही.त्यासाठी पूर्ण जिल्हा आहे. याचा अर्थ पिंपळनेर परिसरात विशेष पथकाने सुरुवातीला केलेल्या 1–2 कारवाया या हप्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी होत्या.

असं वाळू माफिया देखील छातीठोकपणे बोलू लागले आहेत. खबर देऊनही कारवाई होत नाही याचा अर्थ या गोष्टीत देखील तथ्य आहे हे आता जनतेला देखील पटू लागले आहे. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भुतेकर या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या मोबदल्यात मोठी रक्कम देत असल्याच्या गोष्टीवर देखील शिक्कामोर्तब एसपी साहेब तुम्हीच केले आहे. अन्यथा माध्यमांनी बोंब ठोकल्यावर तरी तुम्ही कारवाई केली असती. तुमचं मेहुणी बायको आणि मिंधा संसार झाला आहे.कारण भूतेकरांच्या डोक्यावर तूम्ही वरदहस्त ठेवला नसता हे शेंबड पोरगं देखील सांगेल.


सध्या रस्त्यावर पोलिसांशिवाय दुसरं कोणीच नसताना गेवराई शिरसाळा परळी नेकनुर बीड या ठिकाणी वाळूचे टिपर, ट्रॅक्टर एसपी साहेब तुमच्या संमतीशिवाय रस्त्यावर दिसतातच कसे,? जिल्ह्याच्या सिमांवर पोलीस बंदोबस्त असताना गुटखा येतो कसा? उस्मानाबाद बीड सरहद्दीवरील चेक पोस्टवर रिटायर होमगार्ड वाहनांची तपासणी करून खंडणी गोळा करतातच कसे? चौसाळा चौकीतील पोलिसांनी पंधरा दिवसापूर्वी चार खोक्यांमधून आलेला गांजा पकडून सोडला कसा ? याच फक्त एकच उत्तर आहे ते म्हणजे राजा रामा स्वामींचं या धंद्यांना अभयदान आहे. पैसा फेको तमाशा देखो हि स्थिती पोलीस यंत्रणेची राजा रामा स्वामींनी केली आहे.एकंदरच आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर धनंजय मुंडे यांनी राज्यात बीड जिल्ह्याचा नावलौकिक कमावला तो नावलौकिक राजा रामा स्वामींनी अवैध धंद्यांना दिलेल्या संमतीमूळे मातीत मिसळला जात आहे. एकंदरच या सर्व प्रकारामुळे जिल्ह्याचा सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे.त़ो राज्यकर्त्यांनाच दोष देत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close