आपला जिल्हा

शिरूर कासार येथे ३० खाटांच्या रुग्णालय बांधकामाची ११.०२ कोटी तर रायमोहा ग्रामीण रुग्णालय बांधकामाची ९.०६ कोटींची निविदा प्रसिद्ध

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश

ना. धनंजय मुंडे, आ. बाळासाहेब काका आजबे, आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांचे स्थानिकांनी मानले आभार

बीड —- बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील ग्रामीण रुग्णालयास पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून ३० खाटांच्या रुग्णालय इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध झाला असून, या बांधकामाची ११.०२ कोटी रुपयांची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने आज प्रसिद्ध केली आहे. आ. बाळासाहेब काका आजबे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यासाठी ना. मुंडेंकडे मागणी केली होती.

त्याचबरोबर शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी ९.०६ कोटी रुपयांची निविदा देखील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी आ. आजबे यांच्यासह आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनीही पालक मंत्री महोदयांकडे मागणी केली होती.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अर्थ व नियोजन विभागामार्फत लावण्यात आलेले आर्थिक निर्बंध काही प्रमाणात शिथिल होताच जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह विविध विकास कामांवर जोर दिला आहे.

शिरूर कासार येथे ३० खाटांची क्षमता असलेले रुग्णालय बांधणे त्याचबरोबर मोठी लोकसंख्या असलेल्या रायमोहा येथे ग्रामीण रुग्णालय उभारणे याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती.

दरम्यान या दोनही रुग्णालयांच्या कामास निधी उपलब्ध होऊन कामांची निविदा प्रसिद्ध केल्याबद्दल पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब, आ. बाळासाहेब काका आजबे व आ. संदीप भैया क्षीरसागर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष गोकुळ सव्वाशे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश बडे, ग्रंथालय सेलचे राज्य उपाध्यक्ष संतोष जरांगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवी आघाव, ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष वारे नाना, माजी पंचायत समिती उपसभापती राजाभाऊ खेडकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील नागरगोजे, अक्षय जाधव, चेअरमन भागवत काकडे यांसह आदींनी आभार मानले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close