आपला जिल्हा

दिलासा: माजीमंत्री क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश बीडमध्ये होणार 200 खाटाचे नवीनअद्ययावत रुग्णालय

बीड- येथील जिल्हा रुग्णालयाच्या शेजारीच असलेल्या जागेवर अतिरिक्त 200 खाटाचे रुग्णालय व्हावे यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गेल्या दहा वर्षापासून सातत्याने प्रयत्न केले होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या दोनशे खाटाच्या रुग्णालयासाठी 50 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून ही निविदा प्रक्रिया आता पूर्ण होत आहे

बीड येथे जिल्हा रुग्णालयात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 200 खाटाचे अतिरिक्त रुग्णालय व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू केला होता माजी मंत्री क्षीरसागर हे पालकमंत्री असतानाच या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती त्यानंतर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून पंकजाताई मुंडे यांनी देखील या कामासाठी प्रयत्न केले रुग्णालयासाठी हवी असलेली जागा ही गृहविभागाकडे होती त्यामुळे माजीमंत्री क्षीरसागर यांनी तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून ही जागा जिल्हा रुग्णालयासाठी हस्तांतरित केली, त्याच वेळी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती ही संपूर्ण प्रक्रिया माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यामुळे पूर्ण झाली आता ही निविदा प्रक्रिया पूर्ण होताच या रुग्णालयाचे देखील तात्काळ काम सुरू होणार आहे गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून माजी मंत्री क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे रायमोहा आणि शिरूर या ठिकाणी देखील अद्यावत रुग्णालयासाठी मंजुरी मिळाली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close